पंढरपूर / प्रतिनिधी
---------------------------
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार भारत भालके हे 13 हजार 568 मतांनी विजयी होत आमदारकीची हैट्रीक केली आहे.
भाजपचे उमेदवार जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक व अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांचा त्यांनी पराभव केला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.वास्तविक हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आलेला होता.मात्र मुख्यमंत्र्यांनी हा मतदारसंघ खुबीने काढून युतीचे घटक पक्ष असलेल्या रयत क्रांतीला दिला होता.
परिचारक यांना सर्व पक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला होता मात्र भालके यांनी सामान्य जनतेच्या जोरावर हा विजय खेचून आणला व तिसऱ्यांदा विजयी झाले.
दरम्यान आमदार भारत भालके यांच्या विजयानंतर मंगळवेढा शहरात व तालुक्यात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाक्यांचे आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला
13 हजार 568 मतांनी भारत भालके विजयी
---------------
एकूण मते-
भारत भालके-89191
परिचारक- 75623
समाधान आवताडे-53648
शिवाजी काळूगे-7202
संतोष माने- 3937
दत्तात्रय खडतरे-1848
नोटा-633