मोहिते-पाटील गटाचा परिचारकांना पाठिंबा - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, October 9, 2019

मोहिते-पाटील गटाचा परिचारकांना पाठिंबामंगळवेढा / प्रतिनिधी

------------------------------


            विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक व आ.प्रशांत परिचारक यांनी माजी उपमुख्यमंंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी भेट घेतली असता विजयसिंह मोहिते-पाटील यांनी परिचारकांना या निवडणुकीत सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन देत मोहिते-पाटील गट परिचारकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे माजी प्रांतिक सदस्य राहुल शहा, संत दामाजी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुर्यकांत ठेंगील, जि.प.सदस्य वसंतनाना देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक जयंत साळे मंगळवेढयाचे माजी सभापती राजाराम जगताप, राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष दिपक वाडदेकर, राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष भारत पाटील, माजी शहराध्यक्ष अजित जगताप, मुझफ्फर काझी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुजित कदम, राष्ट्रवादीचे नगरसेवक बशीर बागवान, माजी नगरसेवक अ‍ॅड.धनंजय हजारे, विजय-प्रताप युवा मंचचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब नांगरे, शहराध्यक्ष विजय बुरकुल, डोंगरगावचे माजी उपसरपंच शिवाजी जाधव, युवक नेते बाबा कोंडुभैरी, खन्ना माळी, सद्दाम मकानदार, अविनाश माने आदि उपस्थित होते.

दरम्यान, आमदार भारत भालके हे राष्ट्रवादीचे उमेदवार असून राष्ट्रवादीतील अनेक आजी माजी पदाधिकारी भालकेंना ऐन निवडणुकीत सोडून जात असल्यामुळे भालकेंचे टेंशन वाढले आहे.

Pages