आज हुलजंती येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार बिरोबा गुरु - महालिंगराया शिष्य पालखी भेट सोहळा - Pantnagari Times

Breaking News

Sunday, October 27, 2019

आज हुलजंती येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार बिरोबा गुरु - महालिंगराया शिष्य पालखी भेट सोहळाहुलजंती / प्रतिनिधी

------------------------------

श्री.महालिंगराया भेट सोहळा

आज २८/१०/२०१९ दिवाळी आहे.आज गुरू बिरोबा शिष्य महालिंगराया यांची भेट दरवर्षी प्रमाणे सायंकाळी पाच वाजता श्री क्षेत्र हुलजंती येथे होणार आहे.

               बारामती जन्मभूमी तून कुलदैवत सोणारसिद्धाचा आशिर्वाद घेऊन वडिल तुकापराया चुलते सोमराया सोबत महालिंगराया खाण देशात भ्रमण करत करत हुलजंती ला आले आहे.हा खूप मोठा प्रवास आहे.मोठा इतिहास आहे.हा इतिहास अठरा पुराणात सापडत नाही.सबब अठरा पुराणे वाचून हा इतिहास माहिती होतं नाही.

               रूद्र अवतार बिरोबा तप करत होता.हे तप कशासाठी करत होता.उत्तम सेवक,उत्तम भक्त, उत्तम शिष्य मिळावा म्हणून अग्रयानी नदी च्या काठावर बिरोबा तप करत होता.या तपाचे फळ म्हणून महालिंगराया या भूमीला लाभले आहेत.पूर्वी ॠषी तप करायचे.कशासाठी?या तपात विघ्न आणायचे काम देवाचा राजा  इंद्र करायचा.काही ॠषी यज्ञ करायचे व यज्ञात दानव राक्षस विघ्न आणायचे.

तप म्हणजे काय??कोण करते? कशासाठी केले जाते.किती कालावधी लागतो.

तप हे बारा वर्षांचे असते.

तप केले तर इंद्राला काय त्रास होत असेल??.यज्ञात कर्मकांड केलं जातं.यज्ञ केल्यावर राक्षस का विघ्न आणायचे?तप करतात तेव्हा कोणतं ही कर्मकांड केलं जातं नाही.हा फरक आहे.


तप म्हणजे ठरवून एखादी कृती नियोजित जागेवर नियोजन करून बारा वर्षे पर्यंत कठोरपणे अंमलबजावणी करणे.यश शंभर टक्के मिळते.एक हजार लोकांना सोबत घेऊन एक वर्ष तप केले तर ते तप हजार वर्षे केले असं समजलं जातं.१वर्ष X१००० व्यक्ती=१०००वर्षे.


बारा व्यक्तीना सोबत घेऊन एक वर्ष तप केले तर ते बारा वर्षे तप केले असं समजून घेणे .

टीम वर्क महत्त्वाचे आहे.

टीम मध्ये किती कार्यकर्ते आहेत.हे महत्त्वाचे ठरते.टीम लिडर जे स्टॅटेजी ठरवतो ती महत्त्वाचा भाग आहे.


आपला विषय आहे बिरोबा ने बारा वर्षे तप केले.

हा संशोधनाचा विषय आहे.या तपाचे फलित महालिंगराया शिष्य म्हणून बिरोबा स लाभला आहे.


या बिरोबा देवाच्या तपात धनगरांच्या वसाहती चे रहस्य दडलेले आहे.यात च धनगरांच्चा इतिहास आहे.याची उकल करण्यासाठी बौद्धिक क्षमता पाहिजे.यातून समाजाचा भावनिक विकास अपेक्षित आहे.


गुरू बिरोबा शिष्य महालिंगराया भेट ही धनगरांच्चा सांस्कृतिक कार्यक्रम आहे.


प्रा.नामदेव थोरबोले.


Pages