मंगळवेढा / प्रतिनिधी
-------------------------------
252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्याच्या पूर्व भागाला सुरुंग लावला असून मंगळवेढा तालुक्यातील जवळपास सर्व गटाचे नेतेमंडळी एकत्र आणण्यामागे त्यांना फार मोठे यश मिळत आहे माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे व्यक्तिमत्व धनगर समाजाचा श्वास म्हणून ज्यांची ओळख आहे ते तानाजी खरात मुढवी हे दयावान ग्रुप व टी के बॉस या नावाने तरुणांमध्ये परिचित आहेत मंगळवेढा मध्ये त्यांच्या नावाचा एक विशिष्ट गट असून आदरणीय खासदार विजयसिंह मोहिते पाटील मंगळवेढा नगरपालिकेचे माजी गटनेते अजित जगताप भारत पाटील युटोपियन शुगर चे चेअरमन सन्मानीय उमेश रावजी परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श तानाजी खरात अर्थात टी के बॉस यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना आपला पाठिंबा जाहीर केला मुरब्बी राजकारणी म्हणून परिचित असणारे सुधाकरपंत परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्यातील जवळपास सर्व गटातील नेते एकत्रित केले आहेत हे परिचारक साहेब यांचे खूप मोठे यश मानले जात आहे