विरोधकांमुळेच या भागातील विकास खुंटला आहे:- उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, October 16, 2019

विरोधकांमुळेच या भागातील विकास खुंटला आहे:- उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदीमंगळवेढा / प्रतिनिधी

--------------------------------


              महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी बोराळे येथे आले असून सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी लक्ष्मणराव ढोबळे बोलताना पुढे म्हणाले की;विरोधकांची चांगलीच हजेरी घेतली ज्या पध्दतीने आपल्या पुढे  बोलतात. लक्ष्मणराव ढोबळे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत आमदार भालके यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले यावेळी त्यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे आमदार भालके यांनी वाटोळे केले आहे तसेच सर्व कामगारांचे प्रपंच देशोधडीला लावले आहेत 40 कोटी रुपयांच्या ठेवी स्वतः गडप करून कारखान्यात चारशे ते पाचशे कोटी रुपयांच्या कर्ज करून ठेवले आहे अशा प्रकारची सणसणीत टीका यावे लक्ष्मणराव ढोबळे यांनी बोलताना व्यक्त केली.

यावेळी लक्ष्मण सावदी बोलताना पुढे म्हणाले की; हा सर्व कर्नाटक बहुल म्हणजे कन्नड भाषिकांचा भाग असून या भागांमध्ये सर्व कन्नड लोके मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून या मंगळवेढा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये हुलजंती व बोराळे या दोन्ही गटांमध्ये कन्नड भाषिकांची संख्या जास्त असल्या कारणामुळे येथील मतदार वर्षानुवर्षे विकास कामापासून वंचित राहिला आहे त्यामुळे आपण एकदा ज्येष्ठ असे पंढरपूरचे नेते माननीय श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांना निवडून द्यावे तसेच जो आपल्या भागातील विकास खुंटला आहे तो विकास करण्यासाठी ते कायमस्वरूपी कटिबद्ध राहतील.

तसेच पंत काकांनी म्हणजे थोरल्या मालकांनी जर मला सांगितले तर दोनच दिवसांमध्ये कर्नाटक राज्याची लोकप्रिय मुख्यमंत्री मा येड्डीगुरप्पा यांना सुद्धा मी या भागात प्रचार सभेसाठी घेऊन येईन.. असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी उपमुख्यमंत्री सावदी पुढे बोलताना म्हणाले की कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा काही भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे ही पाणीटंचाई सोडविण्यासाठीच आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना  केले.

यावेळी लक्ष्यमण ढोबळे (सर) पंढरपूरचे वामनराव माने (सर),

जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शिवानंद पाटील दाजीकाका भूसनर, सुधाकर भिंगे, संतोष घोडके, आप्पा गणपत मासाळ, रयत क्रांती चे दीपक भोसले, तानाजी खरात,किरण जाधव,विश्र्वनाथ पाटील,प्रकाश कोरे,लक्ष्मण पांढरे, आदी मान्यवर या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोराळे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सभेसाठी हजर होते.

ही सभा यशस्वी करण्यासाठी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी युटोपियन सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Pages