मंगळवेढा / प्रतिनिधी
------------------------------
252 पंढरपूर मंगळवेढा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्रचार सभेच्या माध्यमातून आमदार प्रशांत परिचारक व आमदार भारत भालके हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी तालुक्यातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर अधिक लक्ष केंद्रित करून लोकं प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे परिचारक गटाचा आत्मविश्वास वाढला तर आमदार भालके गटाने खासदार अमोल कोल्हे यांच्या सभे निमित्त शक्तिप्रदर्शन केले.
अपक्ष उमेदवार समाधान अवताडे यांनी चुलते बबनराव अवताडे यांचा आधार घेत ताकद भक्कम केली अशा परिस्थितीत प्रचारात आमदार परिचारक आणि आमदार भालके एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
केंद्र सरकारच्या या योजनेची अंमलबजावणी केल्याचे सांगताना परिचारक गटाकडून तालुक्यातील मंगळवेढा उपसा सिंचन योजना रखडलेले बसवेश्वर व चोखोबांचे स्मारक दुष्काळ निधी तुरीचा पिक विमा रब्बी दुष्काळ निधीत तालुक्याचा समावेश असणे यावर लक्ष केंद्रित केलेले दिसत नाही उलट याच मुद्द्यावर आमदार भालके आणि आपण विरोधी पक्षाचा आमदार असून सरकारने या मुद्द्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले असून या रखडलेल्या मुद्द्यांवर सरकारवर बोट ठेवले आहे.
अशा परिस्थितीत अपक्ष उमेदवार समाधान आवताडे हे त्यांच्या प्रचाराला प्रभावी वक्ता व नेता नसतानाही बाजी मारत असल्याचे दिसून येत आहे.मतदारसंघातील वाढलेली बेरोजगारी व्यसनाधिनतेचे वाढते प्रमाण यावर प्रकाश टाकत आहेत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून चांगल्या ठिकाणी वाव देण्याच्या दृष्टीने तालुक्यात भविष्यात उद्योग निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते सांगतात. सूतगिरणी व अवताडे उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे केलेले काम ते मतदारांसमोर मांडत आहेत.जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याला मिळालेला निधी या जोरावर ते सध्या विधानसभेला सामोरे जात आहेत.