मंगळवेढा / प्रतिनिधी
--------------------------------
चाळीस वर्षापासून अविरतपणे या भागाचा कायापालट करण्यासाठी सुधाकर पंतांनी काम केले असून आशा निष्कलंक व्यक्तिमत्वाला विधानसभेत पाठवण्याची संधी मिळाली असून याचा फायदा घ्या असे आवाहन खासदार जय सिद्धेश्वर यांनी केले ते शनिवारी मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर आरळी बोराळे नंदुर डोणज तांडोर तामदर्डी या पूर्व भागातील गावात महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित गाव भेट दौरा येथील सभेत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर चरणूकाका पाटील,दिनकर मोरे,शशिकांत चव्हाण,वामनराव माने, दाजी पाटील,युन्नूस शेख, शिवानंद पाटील,रयतक्रांती प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले, आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना महाराज यांनी सत्तेची चावी हातात नसल्या नंतर विकास कामाची तिजोरी खोलता येत नाही असे सांगत तालुक्याच्या रखडलेल्या योजना आणि प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या व विकासपुरुष नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सत्तेत असणारा आमदार म्हणून परिचारक यांना मदत करा कारण मतदार संघाला गेल्या काही वर्षांपासून सत्तेतील आमदार मिळाला नाही त्यामुळे मतदारसंघातील विकास खुंटला असे सांगितले.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी बोलताना आ. भारत भालके यांच्यावर टीकास्त्र सोडले जुना गडी बदलण्याची ही योग्य वेळ असून रस्ते, वीज पाणी भीमा नदीवरील बॅरेजेस बंधारा आदि विकास येणाऱ्या काही महिन्यात होणार आहे यासाठी वचनपूर्ती करणारा नेता म्हणून परिचारक यांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना निवडून देऊया कारखान्यावर संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर चेअरमन पद बळकावत 40 कोटींच्या ठेवी गडप केल्या. कर्जाचा डोंगर चारशे कोटी पर्यंत करून शेतकऱ्यांची देणे न देणाऱ्या नेत्याला घरी बसवा असे आवाहन केले.
या प्रसंगी बापुराया चौगुले, जालिंदर व्हनुटगी,अण्णासो नांगरे पाटील,अप्पासाहेब पाटील,डॉ.आर.के.तोरवी,राजेंद्र लाड,गजानन चौगुले,रमेश कोळी,बाबासो बिराजदार सह अनेक मान्यवर उपस्थित होते.