धनश्री परिवाराच्यावतीने प्रा. नामदेवराव जाधव यांच्या व्याख्यानाचे आयोजन - Pantnagari Times

Breaking News

Saturday, September 7, 2019

धनश्री परिवाराच्यावतीने प्रा. नामदेवराव जाधव यांच्या व्याख्यानाचे आयोजन


मंगळवेढा / मदार सय्यद

-----------------------------------


       राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज, बिजनेस कोच, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक प्रा. नामदेवराव जाधव यांचे शिवचरित्रातून, चला उद्योजकतेकडे या विषयावर धनश्री परिवाराच्यावतीने रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा. श्री. संत तनपुरे महाराज मठ, पंढरपूर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी दिली आहे.

हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजु (बापु) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा प्रचार आणि प्रसार कार्य करून मराठ्यांच्या इतिहासाची पुनर्मांडणी करत ज्यांनी १० हजाराच्यावर व्याख्याने दिली आहेत. जवळपास ३५ बेस्ट सेलर पुस्तके असणारे मराठीतील प्रसिध्द लेखक शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करू पाहणाऱ्या ध्येयवादी उद्योजकांसाठी अतिशय बहुमोल असे मार्गदर्शनपर व्याख्यान प्रा. नामदेवराव जाधव यांचे होणार आहे. तरी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.

Pages