शिवसेनेच्या 'प्रथम ती' महिला समेलनास उदंड प्रतिसाद
पंढरपूर / मदार सय्यद
------------------------------
पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे तसेच संपर्कप्रमुख डॉ ना. तानाजीराव सावंत यांच्या आदेशाने व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेली ' प्रथम ती ' या महिला संमेलनाचे शिवसेना महिला आघाडी पंढरपूर विभाग यांच्यावतीने व शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैलाताई गोडसे यांच्या पुढाकाराने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या महिला शिवसेना नेत्या माजी महापौर शोभा राऊळ,मुंबई नगरसेविका शितल म्हात्रे,नाशिक संपर्क प्रमुख स्नेहल मांडले,सोलापूर संपर्कप्रमुख संजनाताई घाडी ,शैलाताई सावंत, शैला गोडसे,तसेच शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत,शिवसेना ज्येष्ठ नेते साईनाथभाऊ अभंगराव,जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महिला समेलनाला मार्गदर्शन करताना शोभा राऊळ म्हणाल्या, महिला सक्षमी करण करणे हाच उद्देश आहे.प्रथम ती ही संकल्पना आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे मिशन सादर झालेले आहे.या मिशनच्या माध्यमातून अशा महिलांशी आम्ही संवाद करत आहोत की समता,शिक्षण, स्वावलंबन,स्वास्थ्य, आणि सुरक्षा या पंचसुत्री माध्यमातून महिला कशा प्रकारे सक्षम होतील .यासाठीच आमचा प्रयत्न राहील.महिला सक्षम झाली तर तिचे संपूर्ण कुटुंब सुरक्षीत राहील.यासाठी आमचा प्रथम ती महिला या समेलनाच्या माध्यमातून राज्यातील महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.आज पहिला टप्प्यातील ,पंढरपूर, सोलापूर येथे महिला समेलन पार पडले.यावेळी महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना सोलापूर जिल्हा उप प्रमुख सुधीर अभंगराव, तुकाराम भोजने तालुका प्रमुख महावीर देशमुख,तुकाराम कुदळे शहरप्रमुख रवि मुळे. सुनिल दत्तू ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा अध्यक्ष जयवंत माने समन्वयक श्रीशैल कुंभार विधानसभा संघटक संजय घोडके तसेच शिवसेना महिला तालुकाप्रमुख आरती बसवंती,शहर प्रमुख पूर्वा पांढरे,संगीता पवार,शारदा जावळे,आदिं महिलां पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभाप्रमुख, शाखाप्रमुख तसेच महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.