मंगळवेढा / मदार सय्यद
----------------------------------
सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी आज मंगळवेढा येथे विशेष शांतता कमिटीची बैठक घेतली.मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील गणेशोत्सव,नवरात्र महोत्सव व मोहरम सणाबाबत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या बैठकीत मंगळवेढा शहरातील नवरात्र महोत्सव व गैबीपीर दर्गाह ऊरूस यांच्यामुळे सामाजिक सलोखा निर्माण होऊन तालुक्यात हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे.गैबीपीर ऊरूस हिंदूच्या पुढाकाराने तर नवरात्र महोत्सव मुस्लिमांच्या पुढाकाराने साजरा होतात.अशी माहिती सांगून जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी यांनी जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ मंगळवेढा यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात घटस्थापने करिता पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी निमंत्रित केले.
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये नागरिकांची पासपोर्ट,शस्त्र परवाना ना हरकत,उत्सव परवानगी आदी कामे तात्काळ मार्गी लावणेबाबात संबधित पोलिस निरीक्षकांना सक्त सुचना देण्यात आले असून लोकाभिमुख प्रशासन करण्यात प्रयत्न करत आहोत.मंगळवेढा तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात असून सामाजिक सलोखा आहे हे कौतुकस्पद आहे.असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी केले.
गणेश उत्सव,नवरात्र महोत्सव डेजी सारख्या वाद्यांवर कठोर कारवाई करून वाहनासह वाद्य जप्त करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी मंगळवेढा पोलिस निरीक्षक व सांगोला पोलीस निरीक्षक यांना दिल्या.
मंगळवेढा शहरात महत्वाचे ठिकाणी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवण्यात आले आहेत.परंतु काही सी.सी.टी.व्ही.कॅमेरे नादुरुस्त असून पोलीस विभागाने दुरूस्त करणेबाबतची सुचना अॅड.रमेश जोशी यांनी मांडली.याबाबत तात्काळ सी.सी.टी.व्ही.कॅमेरे दुरूस्ती करण्याचे सुचना मंगळवेढा पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांना दिल्या.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांचा रतनचंद शहा सहकारी बॅंकेचे संचालक अँँड.रमेश जोशीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील,जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी,रतनचंद शहा सहकारी बॅंकेचे संचालक अॅड.रमेश जोशी,काँग्रेसचे शहराध्यक्ष मारूती वाकडे, काँग्रेसचे भीमराव मोरे,नगरसेवक राहूल सावंजी,दै.स्वाभिमानी छावाचे संपादक ज्ञानेश्वर भगरे,मंगळवेढा पोलीस निरीक्षक अनिल गाडे,सांगोला पोलीस निरीक्षक राजेश गवळी आदी उपस्थित होते.