पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या रिंगणात शिवबुद्ध संघटना उतरणार संदीप मुटकुळे - Pantnagari Times

Breaking News

Thursday, September 19, 2019

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या रिंगणात शिवबुद्ध संघटना उतरणार संदीप मुटकुळेमंगळवेढा / मदार सय्यद

------------------------------------            पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आपले उमेदवार निवडणूक रिंगणात  उतरविताना दिसत असताना या मतदारसंघात शिवबुद्ध संघटनाही निवडणूक लढविणार असल्याचे मत या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी व्यक्त केले पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेल्या या संघटनेच्या राजकीय भूमिकेने राजकीय गोटात नक्कीच खळबळ होणार आहे.

काही दिवसावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आपण स्वतः निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी दिली गेल्या अनेक वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवक आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या कार्याच्या जोरावर आपण ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले .पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये

 जनसामान्यांचे आणि गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी,रोजगार ,कामगार या लोकांना भगव्याकार्डधारकांना व पिवळ्याकार्डधारकांना रेशन दुकानातून धान्य मिळवून देणे ही कामे करत असतानाच शासनाच्या अनेक योजना सामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी उपोषणे,आंदोलनेही केली . मंगळवेढा आणि पंढरपूर शहरातील नागरिकांना आजही अनेक प्रश्न  भेडसावत आहेत. मंगळवेढा शहरातील नागरिकांना  पिण्याचे पाणी  तसेच  भुयारी गटार योजना  शहरातील स्वच्छता  यामुळे  आजही त्रस्त व्हावे लागत आहे  वर्षानुवर्षे  प्रलंबित असलेला पंढरपूरमधील एम.आय.डी.सी चा  प्रश्न अनेक निवडणूकीनंतर आजही तसाच आहे हे सर्व प्रश्न आणि समस्या आपण निवडणुकीच्या माध्यमातून सोडवून बेरोजगार युवकांनाच्या हाताला काम मिळवून देणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले 

 पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांची ऊस बिले आणि कामगारांचे पगार न देणाऱ्या साखर कारखानदारांच्या विरोधात बंड करणार असल्याची माहिती संदीप मुटकुळे  यांनी दिली आहे . आपला लढा फक्त जनतेच्या हक्कासाठी आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी असल्याचे  संदिप मुटकुळे यांनी सांगितले आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, बेरोजगारांचा मुद्दा घेऊन आपण निवडणूक रिंगणात उतरत आहोत अशी माहिती देतानाच या निवडणुकीत शिव बुद्ध संघटनेच्या प्रवेशाने नक्कीच वेगळे चित्र पहावयास मिळेल असा विश्वास संदीप मुटकुळे यांनी यावेळी व्यक्त केला .

Pages