मंगळवेढा / मदार सय्यद
---------------------------------
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रं 1 मधून मंगळवेढा तालुक्यातील 3 रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी 5 कोटी 86 लाख रुपयांची रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती यापैकी आज 1) हुन्नूर ते सूर्यवंशी रस्ता व 2) मारोळी ते जाडर बोबलाद या रस्त्याच्या कामाचे आमदार भारत भालके साहेबांच्या शुभहस्ते भुमिपुजन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती तानाजी काकडे, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते नितीन पाटील, हुन्नूर गावचे सरपंच मच्छिंद्र खताळ, बिरोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष व माजी उपसरपंच राजाराम पुजारी, बि.टी.पुजारी, माजी सरपंच जगन्नाथ रेवे, बसवराज पाटील, खुदाभाई शेख, सरपंच ब्रह्मदेव रेवे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश साळुंखे, गुलाब माने, मधुकर सूर्यवंशी,भगवान कटरे सर, महादेव पाटील, मच्छिंद्र पुजारी, मुन्ना शिरसागर, मारुती होनमोरे, दिनकर माने, अरुण चव्हाण, गोटू चौगुले,शहाजी सूर्यवंशी, सोपान कदम, अमोल सूर्यवंशी, आनंदा आमुगे, यशवंत होळकर, मरगु कोळेकर, ठेकेदार चेतन गाडवे उपस्थित होते.