एकवेळ संधी द्या मतदारसंघात विकास क्रांती घडवेन -समाधान आवताडे - Pantnagari Times

Breaking News

Saturday, September 14, 2019

एकवेळ संधी द्या मतदारसंघात विकास क्रांती घडवेन -समाधान आवताडेमंगळवेढा / मदार सय्यद

-----------------------------------


                मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न मी लहान असल्यापासून ऐकत आलो असून परंतु कोणीही हा पाणी प्रश्न सोडवला नाही.याता यापुढील काळात नुसती आश्वासने नको आहेत तर प्रत्यक्ष कृती करण्याची गरज निर्माण झाली असल्याने आपण एकदा मला संधी देऊन पहा कारण मी जे बोलतो ते करूनच दाखवत असतो असेही समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.ते श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना येथे नव्याने सुरू होत असलेल्या "आसवनी प्रकल्पाच्या भूमिपूजन" समारंभात बोलत होते.आसवनी प्रकल्पाचा शुभारंभ पंढरपूरचे ह.भ.प.अॅड.जयवंत बोधले महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि.महाराष्ट्र राज्य स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅक लि.मुंबईचे प्रशासकीय सदस्य अविनाश महागावकर होते.

आवताडे पुढे बोलताना ते म्हणाले की, पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात बेरोजगारी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या आधीच्या प्रत्येकाने आपाअपल्या सोईने राजकारण केले असून यामुळे मतदार संघात बेरोजगारी ही समस्या वाढली आहे. आपण आपल्या तव्यातील भाकरी यावेळेस पलटी मारा अन्यथा कोणालाच भाकरी मिळणार नाही.त्यामुळे येणार्या काळात मला संधी द्या मी आपले सर्व प्रश्न लावतो. पुढे बोलताना ते म्हणाले की कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.मारवाडी वकील साहेब व  व्हा.चेअरमन कै.रतनचंद शहा शेढजी हे आज हा सोहळा स्वर्गातून पाहत असतील व त्यांच्या डोळ्यात आज आनंदाश्रू आले असतील असे उद्गारही आवताडे यांनी काढले.खरे मंगळवेढा ही दामाजी पंताची नगरी असल्याने या आसवनी प्रकल्पाचे भूमिपूजन हे एखाद्या महान संताच्याच हस्ते करण्याचे ठरविल्याने आम्ही बोधले महाराजांना बोलावलं असून त्या माध्यमातून आम्ही संतांची परंपरा कायम ठेवली आहे.पाठीमागच्या संचालक मंडळाने हा प्रकल्प बी.ओ.टी.तत्वावर देण्याच्या हालचाली केल्या होत्या परंतु आम्ही काहि मोजक्या संचालकांनी त्यास कडाडून विरोध केला होता. म्हणूनच आज हा प्रकल्प 57 कोटी 40 लाखात झाला आहे. येत्या सहा महिन्यात सर्वच प्रशासकीय मान्यता मिळवून हा प्रकल्प सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही शेवटी आवताडे यांनी सांगितले.

यावेळी ह.भ.प.बोधले महाराज व कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश महागावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी जकराया शुगरचे चेअरमन अॅड बिराप्पा जाधव,

जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या सभापती शिलाताई शिवशरण,दामाजीचे शुगरचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी,

कार्यकारी संचालक झुंजार आसबे,पंचायत समितीचे सभापती प्रदिप खांडेकर, उपसभापती विमल पाटील, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख येताळा भगत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या मंजुळाताई कोळेकर,

पंचायत समितीचे सदस्य सूर्यकांत ढोणे, प्रेरणाताई मासाळ, उज्वलाताई लक्षमण मस्के, नगरसेविका रतनताई पडवळे,

लक्ष्मीबाई म्हेत्रे,निर्मलाताई माने, यांच्या सह दामाजीचे संचालक लक्ष्मण जगताप,राजेंद्र सुरवसे,राजीव बाबर, शिवयोग्याप्पा पुजारी, बापू काकेकर, बसवेश्वर पाटील, मारूती थोरबोले,रामकृष्ण चव्हाण,बाळासो शिंदे,सचिन शिवशरण, सौ.स्मिता म्हमाणे,सौ.कविता निकम,संजय पवार, विजय माने,अशोक माळी यांच्यासह सर्व सभासद व कामगार उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक केदार  तर सुत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.

Pages