मंगळवेढा / मदार सय्यद
सोलापूर येथील निर्माते व दिग्दर्शक विशाल पाटील यांच्या पोरी पोरी ही नाचू लागेल या व्हिडीओ अल्बमच्या चित्रीकरणाचा शुभारंभ दै.दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांचे हस्ते व अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी युवा नेते केतन कसबे, निर्माते दिग्दर्शक विशाल पाटील, अभिनेता रोहित शटगार, प्रिया पाटील, मयुरेश माणकेश्वर, मंडळाचे संस्थापक चंद्रशेखर कंडकूर,राकेशचंद्र केशरवाणी यांचेसह मल्लीनाथ बिराजदार, कल्याण चौधरी, संतोष काटगारकर, सिद्धेश्वर मठपती, नागनाथ कोळी, सिद्धेश्वर गुब्याड, सतिश पारेली, संतोष कोळी, मंगळवेढयाचे प्रा.राजेंद्रकुमार जाधव, सुलेमान तांबोळी, लहू ढगे आदि उपस्थित होते.
फोटो ओळी-सोलापूर येथे पोरी पोरी ही नाचू लागेल या अल्बमच्या चित्रीकरणाच्या शुभारंभप्रसंगी दिगंबर भगरे, केतन कसबे, विशाल पाटील व इतर कलावंत.