मंगळवेढा / मदार सय्यद
---------------------------------
धनश्री परिवाराच्यावतीने मंगळवेढा येथे सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 1 सप्टेंबर रोजी होणार असून धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या संकल्पनेतून होत आहे. अशी माहिती धनश्री मल्टीस्टेट संस्थेच्या संचालिका आणि उस्मानाबाद जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष डॉ. राजलक्ष्मी काळुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
समारे 25 वर्षापासून धनश्री परिवाराच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या संकल्पनेतून मंगळवेढा येथे नोकरी महोत्सव आयोजित केला गेला आहे. येथील यशवंत मैदान इंग्लिश स्कूल मंगळवेढा याठिकाणी रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून सुमारे चारशे विद्यार्थ्यांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नोकरी महोत्सवात सामील झालेल्या इतर विद्यार्थ्यांना धनश्री परिवाराच्यावतीने जॉबकार्ड देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना दररोज नोकरीतील संधींची माहिती पुढील 365 दिवस पुरविली जाणार आहे. अशी माहिती डॉ. राजलक्ष्मी काळुंगे यांनी याप्रसंगी दिली मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या या नोकरी महोत्सवात पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद यासारख्या ठिकाणाहून 40 हून अधिक मॅन्युफॅक्चरिंग फार्मसी, रिटेल इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, बँकिंग, टेलिकॉम, आयटी, ऑटोमोबाईल, रियल आणि सिक्युरिटी आदी क्षेत्रातील नामवंत कंपण्या सहभागी होणार आहेत.
या भव्य नोकरी महोत्सवात आय टी आय तसेच बारावी, बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी, एम.ए, एम. कॉम, एम.बी.ए, इंजीनियरिंग डिप्लोमा सह अंतिम पदवी परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवडीची संधी उपलब्ध करून दिली आहे तरी याठिकाणी मुलाखतीसाठी उमेदवारांनी आपल्या बायोडाटाच्या 3 प्रतिसह पासपोर्ट साईज फोटो व मूळ कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या नोकरी महोत्सवात नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. ही नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करता येणार असून याबाबत अधिक माहितीसाठी ९९७०५२०५२४,९८६०१९०९९०,९७६६१०२९६० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांनी केले आहे.