मंगळवेढा / मदार सय्यद
----------------------------------
संतांनी जे साहित्य लिहून ठेवले आहे ते देशभक्तीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पंढरपूरच्या ज्येष्ठ कवीयत्री वैशाली आठवले यांनी केले.
अक्षरगंध साहित्यमंचच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रायमा शिक्षण संकुलात आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानवरून त्या बोलत होत्या. या कवीसंमेलनाचे उदघाटन माजी मुख्याध्यापक ज्ञानोबा फुगारे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर अक्षरगंध साहित्य मंचचे संस्थापक दिगंबर भगरे, जिल्हाध्यक्ष निलकंठ कुंभार उपस्थित होते.
सुरवातीस सरस्वतीचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आठवले म्हणाल्या, संतानी जे विचार मांडले आहेत त्या विचारांची आज समाजाला गरज आहे. देवाच्या भक्ती बरोबरच त्यांनी राष्ट्रभक्तीही जोपासली होती. देशाबाबत प्रत्येकाला अभिमान असायला पाहीजे. आजचे देशभक्तीपर कवीसंमेलन आयोजित करून अक्षरगंधनेही देशप्रेमाचा संदेश दिला असून नवोदित कवींनाही हकाचे व्यासपिठ मिळाले आहे.
यावेळी ज्ञानोबा फुगारे यांनीही आपल्या मनोगतातून, अशा कवीसंमेलनांची आज खरी गरज होती. ती अक्षरगंध पूर्ण केल्याची सांगीतले.
प्रास्तविक निलकंठ कुंभार यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन लता माळी यांनी केले.
या कवीसंमेलनात पंढरपूरच्या वैशाली आठवले, रत्नप्रभा पाटील, मंगळवेढ्याचे ज्ञानोबा फुगारे, धनंजय पाटील, हरिप्रसाद देवकर, दिगंबर भगरे,धनंजय माळी, प्रमोद बिनवडे, सुरेश माळी,बाळू तोंडसे, मंगल बनसोडे, राजश्री पाटील,प्रा.लता माळी, विद्या माने, शिवकांता नकाते,वंदना नागणे, वैशाली खांडेकर, सारिका चव्हाण, सिद्धी माळी, बेगमपूरचे नितिन भांगे आदिनी देशभक्तीपर कविता सादर केल्या.
या कार्यक्रमास राकेश गायकवाड, नवनाथ सावळे, समाधान फुगारे, नितिन बाभळे, विश्वजीत कुंभार, गजानन कसगावडे, सुजाता मुदगुल, शोभा पलंगे, सुनिता कुभार, गीता गुंगे, मायदेव, नेने, ठोंबरे यांचेसह अनेक नागरिक व महिला उपस्थित होत्या.