मंगळवेढा / मदार सय्यद
---------------------------------
प्रा.कांळुगे यांच्या गाव भेट दौऱ्यास बोराळे येथे उस्फूर्त प्रतिसाद
गेली 20 वर्षे काँग्रेस पक्षाचे एक निष्ठेने काम करत आहे. अनेक सामाजिक कार्याच्या व सहकाराच्या माध्यमातून पक्षाचे नाव मतदारसंघाच्या काना कोपर्यात पोहचवले आहे. व या विस वर्षाच्या काळात प्रत्येक निवडणुकीत पक्ष जो उमेदवार देईल त्यालाच आपला पक्ष म्हणून काम केले. या सर्व बाबी लक्षात घेता पक्ष निश्चित संधी देईल अशी खात्री आहे. परंतु जरी पक्षाने डावलले तरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अपक्ष निवडणूक लढविणार असे मत त्यांनी व्यक्त केले.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून गाव भेट दौरा व कार्यकर्ता विचार विनिमय बैठका घेत आहेत. बोराळे येथील बैठकीत ते बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही. प्रत्येक त्यामुळे मतदारसंघ विकासापासून वचिंत राहिला. जर या मतदारसंघाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर भूमिपुत्राला संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे मी आत्तापर्यंत केलेल्या विविध सामाजिक कार्याची पावती म्हणून मला एक वेळ संधी त्या संधीच सोन केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. असे भावनिक आवाहन हि यावेळी कांळुगे यांनी केले. यावेळी बोराळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनोद पाटील,शिवशंकर कवचाळे, बाळासाहेब धनवे, मारुती चौगुले, तानाजी धनवे,शरणु बनसोडे, विश्वनाथ पाटील, चांद राजकुमार स्वामी, रावसाहेब फटे, संतोष गणेशकर, आदी ग्रामस्थ व धनश्री परिवाराचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.