जत / प्रतिनिधी
------------------------
. महा प्रलयकारी पूरा च्या संकटाने हाहाकार माजलेल्या सांगली येथील कृष्णा काठच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून जत शहर मु्स्लीम समाजाच्या वतीने मदती चे हात पुढे सरसावण्यात आल्या ची माहिती जत नगर परिषदे चे माजी नगरायक्ष पट्टु उर्फ इकबाल गवंडी व जत शहर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मकसूदभाई नागारजी आणि उपाद्यक्ष हाजी बंदेनवाज पटाईत यांनी दिली. सांगली मिरज शहरासह शहरांसह परिसर महापुरा ने पछाडल्या च्या पार्श्वभूमी वर आकस्मिक ओढवलेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे उध्वस्थ झालेल्या पुरग्रत कुटुंबियांना मदतमिळावी म्हणून मुस्लीेमांचे पवित्र बकरी ईद हा सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन समाज्याच्या वतीने करण्यात आले होते.त्या अनुषंघा ने समाज प्रमुखांच्या आवाहनास प्रतिसाद देत बकरी ईद दिवशी ईदगाह मैदाना वर च सामूहिक ईदची नमाज पठणा नंतर 1 लाख 20 हजार निधी जमा करण्यात आली अशी माहिती जुमा शीदीचे हाजी रशीदभाई पटाईत व रियाजअहंमद सय्यद (सर) यांनी दिली.शनिवारी सकाळी येथील शाही मशीद प्रांगणात शहरातील प्रमुख मुस्लिम कार्यकर्ते एकत्र जमा होऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक ट्रक भरून अन्न धन्या सह साखर, चहापूड,डाळी,तेल,साबण अशा जीवनावश्यक वस्तू घेऊन रवाना झाले.
सद्या सांगलीच्या अर्ध्या भागात पुराच्या पाण्याने महाभयंकर थैमान घातले असले तर उर्वरित, जिल्ह्याच्या पूर्व भागातील जत, आटपाडी,कवठे महांकाळ तसेच मिरज- तासगांव तालुक्यांचा पूर्व भागात लोकांना पिण्याच्या पाण्या साठी भटकंती करावी लागत आहे.ही कसली विडंबना निसर्गा च्या अश्या उरपाटी खेळात येथील दुष्काळी जनता भरडून निघत आहे.अशा भीषण परिस्थितीत आपलेच मुस्लिम बांधव मानवता हा एकच खरा धर्म व शांतीचा संदेश देणाऱ्या आणि मदतीचे हात सदैव पुढे करणाऱ्या इस्लाम च्या तत्वांचे पालन करीत पूरग्रस्तांच्या मदतिला धावून आले हे आजच्या परिस्थितीत अंत्यंत महत्वाचे मानावे लागेल. मदत साहित्य वाहून नेणाऱ्या ट्रक सोबत येथील जुमा (मर्कज) मशिदीचे प्रा. रियाज सय्यद(सर)हाजी ईजाज हुजरे,रियाज शेख, महेबूब गवंडी,सलीम मुल्ला. अकसा मशिदीचे राजू इनामदार,प्रतिष्ठित व्यापारी दस्तगीर टपाले, सामाजिक कार्यकर्ते इकबाल टपाले. चांदभाई मुल्ला. शाही मशिदीचे नूरजनाब मुल्ला,राजू मुल्ला,शफिक इनामदार,फिरोज मणेर,सलीम मणेर,राजू जमादार,नियाज जमादार.मक्का मशीदी चे मुबारक नदाफ (युवा उद्योजक) हाजी अब्दुल नदाफ,इंजि.समीर नदाफ. मदिना मशिदीचे मूसाभाई गवंडी,सद्दाम अत्तार, मुन्ना पखाली,हरून मुल्ला व तसेच बिलाल मशिदी कडून चान्दसाहेब जातगार आदी 20 ते 25 कार्यकर्ते साहित्य वाटप व मदत कार्या साठी स्वतंत्र वाहनाने सांगलीस रवाना झाले.