*आजचं राशी भविष्य: दि. १ सप्टेंबर २०१९*
*मेष :* कामात सातत्य हे हवेच. वरिष्ठांकडून मदत. सहयोगी साथ देतील.
*वृषभ :* व्यावहारिक निर्णय घ्यावे. नूतन कामात चांगल्या संधी. चांगला दिवस.
*मिथुन :* भागीदारी योग्य पद्धतीने करावी. सज्जनांचा सहवास. भांडवली गुंतवणुकीस चांगला.
*कर्क :* शक्यतो वाद टाळा. हेळसांड नको. भोजनामुळे ताण वा अनारोग्य शक्य.
*सिंह :* सरळ वागा. घेणेकरी सतावतील. वाचन वा चिंतनातून नवी दिशा मिळेल.
*कन्या :* प्रवासात सावधानता, दक्षता हवी. चर्चा वा विवादात जय प्राप्त होईल.
*तुळ :* घमेंड नको. आज लोकसंग्रह वाढवा. चैनी वृत्ती वा हेकेखोर वृत्तीला आळा हवा.
*वृश्चिक :* साधारण दिवस. सोपी भाषा वापरून विरोधकांना समज द्यावी लागेल.
*धनु :* राजकीय डावपेच करावेच लागतील. मित्रांकडून मदत मिळेल. अंदाज अचूक होतील.
*मकर :* आज निसर्ग वा सहलीचा आनंद मिळेल. खेळ वा करमणुकीत मन रमेल.
*कुंभ :* देणी-घेणी आटोक्यात ठेवा. वाढीव पाहुणे वा पाहुणचारामुळे ताण वाढतील.
*मीन :* वाढीव काम हवे. चांगली लोकप्रियता राहील. उत्स्फूर्त कृती क्रियाशीलता वाढवेल.
-------------------------