प्रत्येक लोकप्रतिनिधी नी स्वतःचे काम जनतेसमोर मांडण्यासाठी पुढे आलं पाहिजे- तानाजी सावंत - Pantnagari Times

Breaking News

Friday, August 30, 2019

प्रत्येक लोकप्रतिनिधी नी स्वतःचे काम जनतेसमोर मांडण्यासाठी पुढे आलं पाहिजे- तानाजी सावंतमंगळवेढा / मदार सय्यद

-----------------------------------


        निवडणुकीत आपण जनतेला अनेक आश्वसने देतो. ती पूर्ण झाली का, ती पूर्ण करण्यासाठी त्या उमेदवाराने काय काय प्रयत्न केलं. हे जनतेला समजल पाहिजे. त्या उमेदवाराने ही स्वतः होऊन आपले काम सांगण्यासाठी पुढं आल पाहिजे. शैला गोडसे यांच्या सारख्या नवख्या नेतृत्वाने स्वतः होऊन पुढे येत आपल्या कामाचा अहवाल जनतेसमोर सादर केला आहे. ही जनतेसाठी विश्वास व दिलासा देणारी बाब असल्याचे प्रतिपादन जलसंधारण मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केले.

शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख शैला गोडसे यांनी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना महिला आघडी जिल्हा प्रमुख पद मिळाल्यानंतर त्यानी केलेल्या विविध विकास कामांचा कार्य अहवालाचे प्रकाशन डॉ तानाजी सावंत  यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. शैला गोडसे यांनी अविरत पणे जनतेच्या विविध प्रश्नांसाठी लढा उभारत ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याशिवाय गोरगरीब सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांचे नेमके प्रश्न प्रामाणिकपणे समजून घेत जनतेमध्ये आपले पणाची भावना निर्माण केली आहे. नियोजनबध्द प्रयत्न केल्यास बहुतांश प्रश्न सोडविता येतात हा विश्वास त्यांनी जनतेमध्ये निर्माण केला ही कौतुकाची बाब असल्याचे डॉ तानाजी सावंत म्हणाले.शैला गोडसे यांच्या प्रमाणे प्रत्येक युवा नेतृत्वाने आपल्या कामाचा अहवाल जनतेसमोर ठेवला पाहिजे. तरच लोकप्रतनिधीं आणि जनता यांच्यात विश्वास निर्माण होईल असेही तानाजी सावंत म्हणाले.

यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोगे पाटील जिल्हा प्रमुख गणेश वानकर संभाजी शिंदे माजी आमदार दिलीप माने रश्मीताई बागल नागनाथ शिरसागर शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले महिला आघाडी जिल्हा संघटक अस्मिता गायकवाड  उपजिल्हाप्रमुख चरण चौरे तुकाराम भोजने तालुका प्रमुख तुकाराम कुदळे अशोक भोसले  विभाग प्रमुख गट प्रमुख उपस्थित होते प्रमुख ...... उपस्थित होते.

............................

सरपंच असताना ही मी स्वतःच्या कामाचा अहवाल जनतेसमोर मांडला होता आता जिल्हा परिषद सदस्य, आणि शिवसेना महिला आघडीच्या जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्यानंतर मी केलेली कामे, कामांचा पाठपुरावा इत्यादी बाबींचा  कार्य अहवाल एका कार्य सम्राट मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते सादर करण्याची संधी  मला मिळाली आहे.हे मी माझे भाग्य समजते. यापुढे ही मी प्रत्येक वर्षी आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा प्रमाणिक प्रयत्न करेन 

शैला गोडसे.

जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी, 

जिल्हापरिषद सदस्या

Pages