सरकार परिवाराने श्रावण महीन्याचे चे औचत्य साधून जपली हरित बांधिलकी - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, August 27, 2019

सरकार परिवाराने श्रावण महीन्याचे चे औचत्य साधून जपली हरित बांधिलकी  मंगळवेढा / मदार सय्यद

---------------------------------                खरेदि विक्री संघाचे चेअरमन मा सिद्धेश्वर आवताडे व सरकार परिवार यांनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून हरित बांधिलकी जपण्याचा एक अनोखा उपक्रम राबविला.सरकार परिवार हा प्रत्येक वर्षी श्रावण मासामध्ये किल्ला भाग येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फळे वाटण्याचा कार्यक्रम करत असतो.परंतु यावर्षी यामध्ये अनोखा उपक्रम राबविण्यात आला."वृक्ष वल्ली आम्हा सोयरे दिनचरे" या उक्ती प्रमाणे फळासोबत एक वृक्ष देऊन वृक्षरोपणाचे महत्व सांगण्यात आले.

  येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सफरचंद व एक झाड देण्यात आले.जेणे करून सर्वांनी आपल्या दारासमोर एक झाड लावून त्याचे जतन करावे हा संदेश देण्यात आला.या मुळे आपल्या भागातील वृक्षांची संख्या वाढुन ऑक्सीजन चे प्रमाण व पाऊस वाढण्यास मदत होईल. या उपक्रमा मध्ये एकूण ३ हजार वृक्ष देण्यात आले. अशा या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

     सदर कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा बबनरावजी आवताडे, दामाजी एक्सप्रेस चे संपादक दिगंबर भगरे,युवक नेते स्वप्नील आवताडे सरकार परिवार व एस पी स्पोर्ट चे कार्यकर्ते उपस्थित होते.


Pages