प्रेरणा प्रतिष्ठानचे कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर - Pantnagari Times

Breaking News

Monday, August 26, 2019

प्रेरणा प्रतिष्ठानचे कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीरमंगळवेढा / मदार सय्यद

----------------------------------


          शिक्षक दिनाच्या निमित्त गेली 26 वर्षे सातत्याने देण्यात येणार्‍या प्रेरणा प्रतिष्ठानचे कृतिशील शिक्षक पुरस्काराचे मानकरी आज जाहीर झाले. हा राज्यस्तरीय पुरस्कार शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचा व सन्मानाचा समजला जातो. पुरस्काराची घोषणा प्रेरणा प्रतिष्ठानचे सचिव प्रा.विश्वनाथ ढेपे यांनी केली. पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे.

कनिष्ठ महाविद्यालय-प्रा.विनायक मनोहर कुलबर्मे श्री संत दामाजी महाविद्यालय कनिष्ठ विभाग,मंगळवेढा, माध्यमिक विभाग- शिवाजी विष्णू ठोंबरे, श्री चौंडेश्वरी प्रशाला,सोलापूर, आवंती चेतन पटवर्धन,नुतन मराठी विद्यालय,मंगळवेढा, प्राथमिक विभाग-सुभाष दत्तोबा साळसकर, जि.प.प्राथमिक शाळा,मानेवाडी (धर्मगांव) ता.मंगळवेढा.

सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक संच, महावस्त्र व श्रीफळ असे असून सदर पुरस्काराचे वितरण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात मान्यवरांच्या हस्ते होईल अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी दिली. यावेळी प्रतिष्ठानचे आजीव सदस्य संभाजी सलगर, दिगंबर भगरे, रेखा जडे आदि मान्यवर उपस्थित होेते. प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कारप्राप्त मानकर्‍यांचे अभिनंदन करण्यात आले.

Pages