खर्डी येथील महिला मतदारा सोबत संवाद साधला शैला गोडसे यांनी - Pantnagari Times

Breaking News

Saturday, August 24, 2019

खर्डी येथील महिला मतदारा सोबत संवाद साधला शैला गोडसे यांनी   मंगळवेढा / मदार सय्यद

---------------------------------------

 

              खर्डी ता पंढरपूर येथे वाड्या वस्त्यांवर प्रत्येक घरापर्यंत जाऊन मतदारांच्या समक्ष भेटी घेऊन निवडणुकीला उभे राहण्याबाबत मतदारांचा सल्ला घेतात व  महिला उमेदवार म्हणून मला का प्राधान्य द्यावे हे सांगण्यासाठी शैला गोडसे  महिलांमध्ये जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.त्यांनी आज खर्डी येथे अशाच एका प्रसंगी शेतमजुरी करून घरी परतणाऱ्या महिलांशी संवाद साधला.

शैला गोडसे यांनी एखादी गोष्ट मनात घेतली तर ती शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा संकल्प आहे.आणि तो संकल्प शैलाताई पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असे उदगार शेतातील काम करून आपल्या घरी परतनाऱ्या महिलेने व्यक्त केले आणि जाताना हातात हात घेऊन आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे अभिवचन पण दिले.

Pages