मंगळवेढ्यात तालुक्यातील पाण्यासाठी लढा उभारण्याची गरज : समाधान आवताडे - Pantnagari Times

Breaking News

Friday, August 23, 2019

मंगळवेढ्यात तालुक्यातील पाण्यासाठी लढा उभारण्याची गरज : समाधान आवताडेमंगळवेढा / मदार सय्यद

----------------------------------


         पाण्याच्या प्रत्येक पाळीसाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे.त्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे.आपली राजकीय ताकद कमी पडत असल्याने आपल्यावर ही वेळ आली आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न न सुटल्यास त्यासाठी लढा उभारण्याची वेळ आली तर मी तुमच्यासोबत नेहमी आहे असे प्रतिपादन चेअरमन समाधान आवताडे यांनी केले.जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मारापुर, घरनिकी, ढवळस, मल्लेवाडी, देगाव या गावच्या गाव भेटी प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले माण नदी कोरडी पडलेली आहे. उजनी कॅनॉलद्वारे माण नदीला अतिरिक्त पाणी सोडल्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्न, पशुधन चारा प्रश्न, पिकाचा प्रश्न सुटणार आहेत. पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने आलेली हातची पिके गेली आहेत. पाळीचे पाणी सोडल्यास पाण्याची पुढची पाळी कमी होणार आहे. यासाठी अतिरिक्त पाणी माण नदीला सोडण्यासाठी शासन स्तरावर मी प्रयत्नशील आहे

कोणत्याही प्रकारचे बायप्रॉडक्ट नसताना संचालक मंडळाने कारखाना चांगल्याप्रकारे चालविला आहे. यामध्ये शेतकरी, कामगार यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. आता आपल्या कारखान्याचे डिस्टलरी प्रकल्पाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. नदीला पाणी असेल तर लाईट नसते लाईट असेल तर नदीला पाणी नसते अशी शेतकर्‍यांची दुरवस्था दूर करण्यासाठी मतदारसंघातील असंख्य समस्या सोडवणेसाठी एकत्र येऊया. तसेच बचत गटाच्या माध्यमातून उद्योगधंदे उभा करून प्रगती करा त्यासाठीचे मार्गदर्शन आणि योगदान देण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

सदर प्रसंगी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, शिवसेना मा. तालुकाप्रमुख येताळा भगत सर, संचालक राजेंद्र सुरवसे, मार्केट कमिटी सभापती सोमनाथ आवताडे, कारखान्याचे संचालक सुरेश भाकरे, भुजंगराव आसबे, सचिन शिवशरण, अशोक माळी, भारत निकम, अविनाश मोरे, शिवाजी भुसे, उत्तम  भुसे, आदी मान्यवर उपस्थित होते.विनायक यादव, अविनाश मोरे, देवाप्पा हेंबाडे, विश्वनाथ हेंबाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या गावभेटी दौऱ्याच्या वेळी डॉक्टर सत्यवान यादव, विनायक यादव, सुबराव यादव, राजकुमार यादव, भगवान आसबे, पिंटू मांडवे, सत्यवान यादव, संतोष यादव, अशोक यादव, पांडुरंग माने महाराज, दिलीप आसबे, उत्तम भुसे, बाळासो भुसे, चंद्रकांत भुसे, अंकुश भुसे, अंकुश  क्षीरसागर, बापू भुसे, विठ्ठल इंगळे, चांद मुलानी, नितीन भुसे, संजय भुसे, दत्ता मोरे, विजय पवार, गोरख टाकळे, शिवाप्पा हेंबाडे, देवाप्पा हेंबाडे, भाऊसाहेब हेंबाडे, महादेव हेबांडे, समाधान मोरे, रवी हेबांडे, विश्वनाथ  हेंबाडे, संतोष बावचे, तुकाराम पुजारी,  अनंत मोरे, खंडू  खंदारे, अजित माळी, विठ्ठल माळी, प्रशांत मेटकरी, संभाजी गोडसे, रायबान, अजित गोडसे, बालाजी रायबान, सुभाष ढेकळे, हनुमंत मस्के, दशरथ ढेकळे, अजित माळी, किशोर मोरे, आनंदा डोईफोडे, बबन बनसोडे, बाळू ढेकळे, गणपत ढेकळे, शंकर पाटील, बालाजी ढेकळे, बाबुराव ढेकळे, विठ्ठल मेटकरी, नाथाजी मेटकरी, ईश्वर बनसोडे तसेच सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले आभार डॉक्टर सत्यवान यादव यांनी मानले.

गाव भेट दौरा चालु असताना तेथील दुष्काळाची परिस्थिती व जनावरांच्या हालत पाहता दौरा  संपल्यावर चेअरमन समाधान आवताडे थेट सोलापूर येथे अधीक्षक अभियंता श्री साळे साहेब यांच्याशी समक्ष चर्चा करण्यासाठी गेले व अधीक्षक अभियंता यांच्याशी उजनी कॅनॉल द्वारे अतिरिक्त पाणी माण नदीला सोडणे बाबत चर्चा केली. नदीमध्ये पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या गुंजेगाव, शेटफळ, महमदाबाद, तनाळी, मारापुर, तावशी, चिचुबे, सिद्धेवाडी, घरनिकी, मल्लेवाडी, ढवळस, धर्मगाव, ओझेवाडी या 14 गावातील पिण्याचा तसेच पशुधनाचा प्रश्न गंभीर असून येथील जनतेची माण नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत भावना तीव्र असल्याचे त्यांनी या चर्चेमध्ये सांगीतले. सदरचे पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होऊन पशुधन वाचवण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले या मागणीवर सकारात्मक चर्चा होऊन येत्या आठ दिवसात माण नदीमध्ये पाणी सोडू असे अधीक्षक अभियंता श्री साळे साहेब यांनी सांगितल्याचे समाधान आवताडे यांनी सांगितले.

Pages