मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा डोळ्यांसमोर ठेवून निवडणुकीत उतरणार- प्रा. शिवाजीराव काळुंगे - Pantnagari Times

Breaking News

Thursday, August 22, 2019

मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा डोळ्यांसमोर ठेवून निवडणुकीत उतरणार- प्रा. शिवाजीराव काळुंगेमंगळवेढा / मदार सय्यद

----------------------------------


          पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधने हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून येत्या निवडणुकीत उतरणार असल्याचे प्रतिपादन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी, आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, लेंडवे चिंचाळे, शिरसी, गोणेवाडी, खुपसंगी, पाटखळ आदी गावात दौरा करून तेथील कार्यकर्त्यांशी सवांद साधला.

समाजकारण आणि राजकारण हे जनहितासाठी असावे. 

जनता हीच आपल्यासाठी सार्वभौम आहे. जनतेचा सर्वांगीण विकास हा आपला मुद्दा असून हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे काम करणार आहे.

दुष्काळी मंगळवेढा तालुक्याला पाणी मिळावे यासाठी 1993 सालापासून मा.क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांचे नेतृत्वाखाली आ. भाई गणपतराव देशमुख, .स्व. आर. आर. पाटील, डाॅ.भारत पाटणकर याचे नेतृत्वाखाली कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळी तालुक्याची पाणीसंघर्ष चळवळ उभी राहिली.गेल्या 27 वर्षांपूर्वी उभारलेल्या चलवलीला यश मिळू लागले असून म्हैसाळ चे पाणी मंगळवेढा तालुक्याला मिळण्याच्या मार्गावर आहे.

मंगळवेढा तालुका स्वातंत्र मिळाल्यापासून आज तागायत काँगेसच्या विचाराचा राहिला आहे. 1967 व 1972 पंचवार्षिक वगळता 2004 पर्यत मतदार संघ राखीव असल्याने व मतदारसंघ खुला झाल्यानंतर तालुक्याला बाहेरून आलेले नेतृत्व लाभले आहे परंतु आता आपण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व मतदारसंघातील रखडलेली विकसाकामे, 35 गाव पाणीप्रश्न, म्हैसाळ 6वा टप्पा , रस्ते, पिण्याचे पाणी यांसारखे प्रश्न सोडविण्यासाठी

कटिबद्ध आहे.

आजवर धनश्री परिवाराने अनेक गोरगरीब, जळीतग्रस्त, अपघातग्रस्त कुटुंबियाना आर्थिक मदततीचा हातभार दिला आहे. राईनपाडा घटनेतील बळी पडलेल्याना 5 कुटुंबाना धनश्री परिवाराने पहिल्यांदा प्रत्येकी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करून कुटुंबातील व्यक्तींना आधार दिला, गेली तीन वर्षे पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी झालेल्या गावांना प्रत्येकी 50 हजाराची आर्थिक मदत करीत जलसंधारणाच्या कामात मदत केली.

संस्थेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळी मदत करण्याचा उपक्रम राबविला आहे.

जनभावनेची कदर करून पक्षश्रेष्ठीही आपलावर विश्वास ठेवून आपल्याला संधी देतील. असा विश्‍वासही मला वाटतो आहे. मी कोणाचा विरोध अथवा पाडापाडीच्या राजकारणावर विश्‍वास न ठेवता जनतेचे कल्याण आणि विकास हे मुद्दे डोळ्यांसमोर ठेवून निवडणुकीत उतरणार आहे. समाजसेवा हे माझे प्रमुख ध्येय आहे. परंतु समाजसेवेला जोपर्यंत राजाश्रय मिळत नाही तोपर्यंत खर्‍या अर्थाने जनसेवा घडू शकत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या आग्रहास्तव मी ही विधानसभा लढविणार आहे.

यावेळी विविध गावातील संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages