मंगळवेढा / मदार सय्यद
-------------------------------------
सांगली, कोल्हापूर, सातारा येथे आलेल्या महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचे संसार उघडयावर पडले आहेत. त्यांना हातभार लावण्यासाठी दै.स्वाभिमानी छावा परिवाराच्यावतीने तिसर्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार दि.1 सप्टेंबर रोजी सायं.6.30 वाजता श्रीराम मंगल कार्यालय येथे वर्षारंग हा हिंदी मराठी गाण्यांचा लाईव्ह शो आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगांवकर या गाताना पहावयास मिळणार असून त्यांच्या जोडीला महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद आयाज हे देखील आपली हिंदी, मराठी गीते सादर करून मनोरंजन करणार आहेत. सर्वांसाठी तिकिट दर 500 रू व 300 रू. ठेवण्यात आले असून या कार्यक्रमाचे येणारे सर्व उत्पन्न पुरग्रस्तांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी छावाचे संपादक ज्ञानेश्वर भगरे यांनी सांगितले.