मंगळवेढा / मदार सय्यद
-----------------------------------
भराज्याचे जलसंधारण मंत्री ना. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून पंढरपूर व मंगळवेढा या दोन तालुक्यातील गावांसाठी जलसंधारणाच्या कामासाठी दोन कोटी 50 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी दिली आहे.
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव व तसेच मंगळवेढा तालुक्यातील लवंगी, रेड्डे, सलगर(खु), महमदाबाद या गावांना सिमेंट बंधारे तसेच खोलीकरण नाला पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत सोड्डी, हुन्नूर, पडोळकरवाडी, महमदाबाद (हु) याठिकाणी खोलीकरण व सिमेंट बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे जलसंधारणाची कामे झाली तर त्या भागातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
--------------------------------------
मंगळवेढा येथे शेतकरी मेळाव्यासाठी आल्यानंतर ना. तानाजी सावंत यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यासाठी जलसंधारणाच्या कामाला जास्तीत जास्त निधी प्राप्त करून दिला जाईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी दोन्ही तालुक्यांमध्ये जलसंधारण कामाचा मंजूरी देत कामाचा धडाका सुरू केला आहे. थोड्या दिवसात अजून निधी मंजूर होणार आहे.आम्ही व भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहे.
शैला गोडसे
जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी
----------------------------
पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यासाठी आगामी काळात जलसंधारणाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. जलसंधारणासह सर्वच कामासाठी या दोन्ही तालुक्यांना निधी मिळवून देण्यास मी कटिबद्ध आहे.
ना. तानाजी सावंत
जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य