युटोपियन शुगर्स चा पूरग्रस्तांना मदतीचा हात … जीवनावश्यक वस्तूंचे 2 टेम्पो शाहुवाडी तालुक्यातील दुर्गम भागात रवाना–उमेश परिचारक - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, August 13, 2019

युटोपियन शुगर्स चा पूरग्रस्तांना मदतीचा हात … जीवनावश्यक वस्तूंचे 2 टेम्पो शाहुवाडी तालुक्यातील दुर्गम भागात रवाना–उमेश परिचारकमंगळवेढा / मदार सय्यद

----------------------------------


        गेल्या पंधरा दिवसांत अचानक झालेल्या अतिवृष्टी मुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली,कोल्हापूर, सातारा या ठिकाणी गेल्या काही वर्षांचा उच्चांक मोडीत काढत अतिवृष्टी झाल्याने अत्यंत भीषण अशी पुर परिस्थिति निर्माण झाली आहे.  जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालेले आहे. अचानक आलेल्या या जलसंकटामुळे अनेक जणांनी आपला जीव गमावलेला असून लहान मुले,वयोवृद्ध,तसेच मुकी जनावरे यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.तसेच अनेकजण अद्याप ही पाण्यात अडकून आहेत. अशा वेळी त्यांना मदत करणे,त्यांना मानसिक आधार देणे हे आपले कर्तव्य असल्याने अशा पुरबाधित क्षेत्रातील लोकांना एक मदतीचा हात म्हणून युटोपियन शुगर्स येथून पूरग्रसतांच्या मदतीसाठी 2 टेम्पो जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य रवाना केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.

    यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की,सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या युटोपियन शुगर्स ने सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कारखाना परिसरातील तसेच मंगळवेढ्यातील डॉ.शरद शिर्के,यतिराज वाकळे,लहू ढगे,सादिक रोंगीकर,सौ.ज्योती कलुबर्मे तसेच इतर  नागरिकांनी ही युटोपियन शुगर्स च्या आवाहनास प्रतिसाद देत आपल्यातीला माणुसकीचे दर्शन घडवत साड्या, टॉवेल आदींची मदत केली असल्याचे मत परिचारक यांनी व्यक्त केले

    पुढे बोलताना परिचारक म्हणले की,अचानक उध्भवलेल्या या जलसंकटमुळे सांगली, कोल्हापूर व कराड या भागातील असंख्य गावे पाण्याखाली गेली आहे. त्यापैकि शाहूवाडी तालुक्यातील मौजे करंजफेन हे गाव 10 -15 फुट पाण्याखाली होते.हे गाव व परिसर अतिशय दुर्गम भागात असून त्या ठिकाणी शासकीय व इतर मदत अद्याप ही पोहचली नाही.  दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त झाले आहे . त्यामुळे तेथील लोकांना जीवनावश्यक वस्तु कारखाना कर्मचारी यांचे मार्फत प्रत्यक्ष पूरग्रस्तांना देऊन मदत करण्याचा निर्णय युटोपियन शुगर्स व्यवस्थापनाने घेतला आहे.

      यावेळी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, साधारणपणे १३०० कुटुंब असणारे मौजे करंजफेन हे अतिशय दुर्गम भागात असल्याने या संपूर्ण कुटूबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे कारखाना प्रशासनाने ठरविलेले आहे. १४ ऑगस्ट २०१९ रोजी सदर साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.अतिवृष्टीमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाल्याने चुली पेटलेल्या नाहीत. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या असणार्‍या वस्तु देण्यात येणार असून यामध्ये गव्हाचे पीठ-५कि.,साखर-१ कि.,गोडे तेल-१ कि.,बेसन-१/२कि, तिखट-१०० ग्रॅ., शेंगा चटणी -२०० ग्रॅ.,गरम मसाला -२० ग्रॅ.,तांदूळ-१ कि,साड्या,टॉवेल,देण्यात येणार आहे.

 या सामाजिक कार्यात महिलांनी ही मोलाचा वाटा उचलला असून,कारखाना कर्मचारी वसाहतीतील “पंतश्री महिला स्वयंसहायता समूह पाठखळ”,या गटातील महिलांनी तयार केलेले विविध प्रकारचे मसाले,चटणी इत्यादि साहित्य देऊन या सामाजिक कार्यास मोलाचा हातभार लावला आहे.त्यासाठी या महिला अहोरात्र गेली ३ ते ४ चार दिवस आपले योगदान देत आहेत. तसेच कारखान्यातील कर्मचारी वर्ग,अधिकारी वर्ग,सर्व खाते प्रमुख यांनी आपला १ दिवसाचा पगार पूरग्रसतांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर समाजातील इतर व्यक्तींनी सुद्धा आपआपल्या परीने पूरग्रस्तांना मदत केल्या बद्दल पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

Pages