वाडणारा वाडप्या ओळखीचा असल्याने मंगळवेढा तालुक्याला 16 कोटीचा निधी खेचून आणता आला - समाधान आवताडे - Pantnagari Times

Breaking News

Friday, August 23, 2019

वाडणारा वाडप्या ओळखीचा असल्याने मंगळवेढा तालुक्याला 16 कोटीचा निधी खेचून आणता आला - समाधान आवताडे  मंगळवेढा / मदार सय्यद

-----------------------------------            आपण आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रमाई घरकुल योजनेंतर्गत व विविध विकास कामासाठी आपल्या तालुक्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे व समाजकल्याण सभापती शिलाताई  शिवशरण यांच्या माध्यमातून जवळ जवळ 16 कोटीच्या आसपास निधी आणला असून पंगतिला बसल्यावर वाडणारा वाडप्या ओळखीचा असल्याने जसा फायदा होतो तसाच या दोघांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मोठा फायदा झाला असल्याचे समाधान आवताडे यांनी सांगितले.

 ते राजकीय वाटचाल कशासंदर्भात व कशी असावी याचा विचार विनिमय करण्यासाठी ब्रम्हपुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मंगळवेढा पंचायत समितीचे सभापती प्रदिप खांडेकर,कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती सोमनाथ आवताडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख येताळा भगत,दामाजी शुगरचे संचालक सचिन शिवशरण,भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज, ब्रम्हपुरीचे उपसरपंच आण्णासाहेब पाटील, रा.यु.काॅ. जिल्हाउपाध्यक्ष संजय पाटील,उद्योगपती चारूदत्त पाटील,उद्योजक आनंद पाटील,

मेजर माणिक कोळी आदी उपस्थित होते.यावेळी येताळा भगत,दिगंबर यादव,संजय पाटील,पवनकुमार बिनवडे,अनमोल देशमुखे आदींनी मनोगत व्यक्त केले.

पुढे बोलताना आवताडे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून तालुक्यातील विविध महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याने जनतेने पंचायत समिती व जिल्हा परिषद आमच्या ताब्यात देऊन विश्वास दाखविला त्याच्या बळावर आम्ही आजपर्यंत तालुक्यातील जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करत आलो आहे.या दोन्हीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील तिर्थक्षेत्राचा विकास,रस्ते,सर्व प्रकारच्या घरकुल योजना असतील किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून गरजू जनतेला द्यावयाच्या विविध वस्तू असतील ते पोहचवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. रमाई घरकुल योजनेंतर्गत व विविध विकास कामासाठी आपल्या तालुक्यातील कामासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळ जवळ 16 कोटीच्या आसपास निधी आपण खर्च केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला लोकसंख्येचा आधारावर रमाई घरकुल योजनेंतर्गत घरकुल वाटप करण्याचे ठरल्यानंतर आपल्या तालुक्यासाठी 500 घरकुलांचा कोठा देण्यात आला.परंतु 961 घरकुलांची मागणी असल्याने ती मागणीही जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजयमामा शिंदे व समाजकल्याण सभापती शिलाताई शिवशरण यांच्या माध्यमातून मंजूर करून घेण्यात आली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या आधी  कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सरपंच मनोज पुजारी व उपसरपंच आण्णासाहेब पाटील यांनी सांगितलेल्या प्रत्येक योजना आम्ही पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुरविल्या आहेत व यापुढील काळात देखील आपल्या गावातून आलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे काम मी करणार आहे. कारखान्याच्या कामगारांची पगार व राहीलेले 74 रुपयाच्या बिलासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आपल्या साखर कारखान्यांकडे 2 लाख 80-90 ते हजार साखर शिल्लक असून त्या शिल्लक साखरेची 90 कोटीच्या आसपास किंमत होत आहे. आपल्याला त्यावर क्लेश कर्ज 65-70 कोटी आहे.त्यावर आपल्याला साखरेवर 20 कोटीच्या आसपास उपलब्ध होतील.कारण आता कारखान्यांकडे साखर विक्रीशिवाय दुसरा पर्याय नाही.आणि त्यात केंद्र सरकारने महिन्याला तुम्ही 35-40 हजारच विकायची.त्याचा कोटा केंद्र शासन देते.त्याच्या जास्त विकली तर कारखान्याचे आकाऊंट सील करणे,किंवा ज्या काही शासनाच्या योजना असतील त्याचा सबसीडी बंद करणे असे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्याला साखर विक्री जास्त प्रमाणात करता येत नाही. जर आपल्याला साखर विक्री जास्त प्रमाणात करता आली असती तर आपल्या जवळ 20 कोटीच्या आसपास रक्कम उपलब्ध झाली असती.त्या रकमेमधून कामगारांची पगार 4 कोटी,74 रुपयाच्या बिलाचे 2 कोटी,व्यापार्यांचे थकलेली बिले 3 ते 4 कोटी व इतर सर्व खर्च धरून 14 कोटीच्या आसपास मेळ बसतो आहे.परंतु केंद्र सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे आपल्याला काही अडचणी येत आहेत. परंतु आपण कोणत्याही प्रकारची काळजी करू नये कारण आपल्या पगार व राहिलेल्या बिलाच्या संदर्भात आम्ही बॅकेकडे कर्ज मागणी केली असून महीना अखेरीस निश्चितच काहीतरी मार्ग निघेल असेही त्यांनी सांगितले.

          पुढे बोलताना ते म्हणाले की, शंभर टक्के उजनी भरली असतानाही आपली पिके आपल्या हातात नाहित. हेच जर पाण्याचे नियोजन योग्य झाले असते तर आज आपली पिके आपल्या हातात असती.त्यामुळे येणार्या काळात जर आपण पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने नाही केले तर आपल्यावर खुप मोठे जलसंकट येऊ शकते. त्यातच आपल्या तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर आपल्याला फक्त गाजरच दाखवण्यात आलं. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून सुशिक्षित तरूण आज भरकटत चालला आहे. त्यासाठी योग्य नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. त्या येणार्या काळात कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता गट-तट,भेदभाव न मानता जशी आपण यापूर्वी मला साथ दिली तसीच साथ यावेळीही द्याल अशी अपेक्षा शेवटी आवताडे यांनी व्यक्त केली.

या वेळी मेजर अशोक मोरे,सिध्देश्वर देवपुंजे,काशीनाथ कोकरे व बाबासाहेब चव्हाण आदी शेतकर्यांनी कोणत्याही परिस्थितीत ब्रम्हपुरी येथील जूना पंढरपूर रस्ता करून देण्याची मागणी केल्यानंतर आवताडे यांनी दामाजी शुगरचे संचालक राजनभैय्या पाटील यांच्या सोबत चर्चा करून दोनच दिवसात मार्ग काढण्याचे अभिवचन दिले.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य संदिप पाटील, माजी सरपंच पिंटू लोखूडे,बाबासाहेब इनामदार, हरीदास गुरव,कोडिंबा कोकरे, अनिरुध्द पाटील, अशोक उन्हाळे, संभाजी गोसावी,भारत पवार, सतिश पवार, महादेव चव्हाण, रमेश गुजरे, अंकुश गोसावी, अंगद पाटील, काकासो पाटील, दिपक पुजारी, संजय पुजारी, महेश पुजारी, सुरज मोरे, प्रमोद जगदाळे, कांतीलाल मोरे, बाळासाहेब पाटील,अनिल सोनवले  यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन पवनकुमार बिनवडे यांनी केले तर आभार संजय पाटील यांनी मानले.

Pages