राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनास प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांची लाखाची देणगी - Pantnagari Times

Breaking News

Monday, July 15, 2019

राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनास प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांची लाखाची देणगीमंगळवेढा / प्रतिनिधी

---------------------------


  सुरसंगम ग्रुप, म.सा.प. दामाजीनगर, अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने 3 व 4 ऑगस्ट रोजी मंगळवेढा येथील श्रीराम मंगल कार्यालयात होणार्‍या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनास माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी एक लाख रूपयांची देणगी दिली आहे.

सदरची देणगी त्यांनी म.सा.प.शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे यांचेकडे सुपूर्द केली. यावेळी सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे,नाटय परिषद नियामक मंडळाचे सदस्य यतिराज वाकळे, सुरसंगम ग्रुपचे लहू ढगे आदि उपस्थित होते.

यावेळी प्रा.ढोबळे यांनी मंगळवेढयात पहिल्यांदाच होणार्‍या या उपक्रमाचे व संयोजकाचे कौतुक करून या संमेलनास सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.

फोटो ओळी-राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनास एक लाख रूपयाची देणगी देताना प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, सोबत लहू ढगे, दिगंबर भगरे व यतिराज वाकळे.

Pages