पंढरपूर / प्रतिनिधी
------------------------
मंगळवेढा येथे 3 व 4 ऑगस्ट रोजी होणार्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संयुक्त संमेलनाच्या
अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.द.ता.भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
पंढरपूर येथे झालेल्या संयोजन समितीच्या बैठकीत डॉ. भोसले यांची निवड करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले.
निवडीनंतर संयोजन समितीचे सदस्य तथा मसाप शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी मसाप पुणेचे विभागीय सचिव कल्याणराव शिंदे,संयोजन समितीचे सदस्य तथा नाटय परिषद राज्य नियामक मंडळाचे सदस्य यतिराज वाकळे, सुरसंगम गु्रपचे प्रमुख दिगंबर भगरे,क्रिकेट असोसिएशन मंगळवेढाचे अध्यक्ष डॉ. शरद शिर्के आदी उपस्थित होते.
मंगळवेढा येथील श्रीराम मंगल कार्यालयात होणार्या या राज्यस्तरीय संयुक्त संमेलनात 3 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन होणार असून 4 ऑगस्ट रोजी पुरुष व महिलांचे राज्यस्तरीय संगीत संमेलन होणार आहे. संमेलनासाठी दि. 14 जुलै पर्यंत राज्यभरातील सुमारे 125 जणांनी नोंदणी केली असून नाव नोंदणीची अंतिम मुदत 15 जुलै असल्याने जास्तीत जास्त कवी,साहित्यिक व कलावंतांनी त्वरीत नोंदणी करावी असे आवाहन संयोजन समितीचे प्रकाश जडे,यतिराज वाकळे,दिगंबर भगरे ,डॉ.शरद शिर्के आदींनी केले आहे.