मंगळवेढा / मदार सय्यद
------------------------------------
मंगळवेढा पोलिस स्टेशन येथे नूतन सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.एन.बुरसे रूजू झाले असून त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,बुरसे हे मूळचे बुरसेवाडी,ता खेड चे आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 2002 च्या बॅचचे ते अधिकारी आहेत.पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली तेव्हा प्रथम मुंबई येथे तीन वर्ष,विशेष सुरक्षा विभाग- 3 वर्ष,नवी मुंबई येथील कळंबोली कौपरखैराने येथे 6 वर्ष,संगमनेर येथे 2 वर्ष,सातारा शहर दोन वर्षे,फलटण ग्रामीण 2 वर्षे व त्यानंतर शहर येथे एक वर्ष अशी सेवा बजावली आहे.
तसेच फलटण येथे असताना विशेष मोका अंतर्गत 2 गुन्ह्यामध्ये मध्ये खंडणी,दरोडे तसेच सावकारकी अशा विविध गुन्ह्यामध्ये विशेष कारवाई करून आरोपींना जेरबंद केले होते.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक बी एन बुरसे यांना विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
----------
♦अवैध धंदे तसेच सावकारकीचा नायनाट करणार
मंगळवेढा शहरातील अवैध धंदे तसेच बोकाळलेल्या सावकारकीचा नायनाट करणार आहे तसेच कायदा सुव्यवस्था कोणी मोडण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलिस निरीक्षक बी एन बुरसे यांनी पंतनगरी टाईम्स शी बोलताना दिली.