जिल्ह्यातील सेतुतील विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा शिवबुध्द प्रतिष्ठानचा उपोषणाचा इशारा - Pantnagari Times

Breaking News

Monday, June 17, 2019

जिल्ह्यातील सेतुतील विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा शिवबुध्द प्रतिष्ठानचा उपोषणाचा इशारा  पंढरपूर / मदार सय्यद

--------------------------------


             सोलापूर जिल्हातील सर्वच  तहसील कार्यालयातील सेतुतील सर्वसामान्य पालक व विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट थांबवण्यात यावे ,सोलापूर जिल्हातील सर्वच  तालुक्यातील शाळा, कॉलेज सध्या सुरू होणार आहेत. त्यामुळे पालक विद्यार्थी तहसील कार्यालयात जातीचे दाखले, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमेअर दाखला तसेच अनेक विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी येतात. रितसर प्रस्ताव सादर करूनही वेळेत हे दाखले सेतूत दिले जात नाहीत.

 सेतुतील कर्मचारी उद्धटपणा करत आहेत, सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्थितीत बोलले जात  नाहीत,त्यामुळे पालक व विद्यार्थीना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, कागदपत्राची पुर्तता करूनही दाखले वेळेत मिळत नाहीत. तसेच बाहेरचे एजंट व कर्मचारी यांच्या मिलिभगत असल्याने पालक व विद्यार्थीना अव्वाच्या सव्वा रक्कम मागितली जाते. रीतसर वेळेत दाखले देण्याचे असताना एका दिवसात दाखले मोठी रक्कम घेऊन दिले जातात. त्यामुळे या सर्वच सोलापूर जिल्ह्य़ातील सेतूची शासकीय  चौकीशी करण्यात यावी, तसेच, सर्वसामान्य गरीब पालक व विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी व त्यांना वेळेत दाखले देण्यात यावेत, अन्यथा आम्ही सोलापूर जिल्ह्य़ातील कोठल्याही तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे    बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे, हे निवेदन प्रांताकार्यालाचे नायबसहसिलदार विजय जमादार साहेब यांना निवेदन देताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे, शिवबुध्दचे सोलापूर जिल्हाध्यक्ष परमेश्वर डांगे, शिवबुध्दचे शहराध्यक्ष मंगेश क्षीरसागर, शिवक्रांतीचेकार्याध्यक्ष सोपान देशमुख, देवराज युवा मंचाचे अध्यक्ष शहाजी शिंदे, विशाल शिंदे, आकाश पवार, आण्णासाहेब दांडगे, भैय्या लिगाडे, शिवबुध्दचे शहरकार्याध्य रविराज मुटकुळे, उपाध्यक्ष अजय गुंड, सागर कवडे, 

इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते,

Pages