मंगळवेढा / मदार सय्यद
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत नगरपालिका मुलांची शाळा नं.2 मधील कु.वेदिका ज्ञानेश्वर भगरे ही 300 पैकी 210 गुण मिळवून जिल्ह्यात गुणवत्ता यादीत 196 वी येण्याचा मान पटकावला.
तिला तिचे वर्गशिक्षक विरेंद्र राक्षे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती कोंडुभैरी, मुख्याध्यापक राजकुमार मांजरे आदिंनी तिचे अभिनंदन केले