मंगळवेढा नगरपरिषद पक्षनेतेपदी पांडुरंग नाईकवाडी यांची खळबळजनक नियुक्ती - Pantnagari Times

Breaking News

Saturday, June 22, 2019

मंगळवेढा नगरपरिषद पक्षनेतेपदी पांडुरंग नाईकवाडी यांची खळबळजनक नियुक्तीआमदार भारत भालके व राहुल शहा यांची आक्रमक भूमिका!


   मंगळवेढा / मदार सय्यद


 मंगळवेढा नगरपरिषद पक्ष नेतेपदी काँग्रेसचे नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आ.भारत भालके यांच्या आदेशाने  काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष व रतनचंद शहा सहकारी बॅकचे चेअरमन राहूल शहा यांनी आपल्या अध्यक्षपदाचा अधिकार वापरून मंगळवेढा नगरपरिषद मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पक्षनेतेपदी नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांची नियुक्ती पत्र जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले यांना दिले आहे.

मंगळवेढा नगरपरिषद पक्षनेते नगरसेवक अजित जगताप यांच्या जागी नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांचा संपर्क अजित जगताप यांना भोवला असल्याची चर्चा आहे.

 मंगळवेढा नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदाचा शब्द आ.भारत भालके व राहूल शहा यांनी नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांना दिला होता.परंतु विद्यमान उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानता ठरल्या प्रमाणे उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही.त्यामुळे आ.भारत भालके यांच्या सह काँग्रेस नेत्यांवर नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांचे कार्यकर्ते नाराज होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरपरिषद मधील राजकीय कुरघुड्याने पक्षश्रेष्ठी वैतागून गेली होती.अखेर आ.भारत भालके यांनी  कार्यकर्त्यांबाबत आक्रमक भूमिका घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका बजावली आहे. 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे पक्षनेत्याला नगरपरिषद सभागृहात व्हीप बजावण्याचे अधिकार आहेत.त्यामुळे या आघाडी विरोधी भूमिका घेणा-या काँग्रेस व राष्ट्रवादी नगसेवकांना आता लगाम बसला आहे.

नगराध्यक्षा सौ.अरूणा माळी यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचालींना वेग आला होता.महाराष्ट्र नगर विकास अधिनियम 1965 अंतर्गत नगराध्यक्षांना कोणत्या पद्धतीने पदावरून खाली खेचता येईल यावर मंत्रालय स्तरावर अभ्यास सुरू आहे.परंतु आ.भारत भालके यांनी आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करून ना रहेगा सांप,ना रहेगी बासूरी अशीच खळबळ उडवून दिली आहे.

Pages