महाराष्ट्राची लाल परी झाली ७१ वर्षाची - Pantnagari Times

Breaking News

Saturday, June 1, 2019

महाराष्ट्राची लाल परी झाली ७१ वर्षाची
मुंबई / मदार सय्यद

--------------------------- 


एसटीचा ७१ एसटीचा ७१ व वर्धापन दिन वर्धापन दिन आज साजरा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लाल परी ७१ वर्षाची होत आहे. राज्यातील विभागीय आणि जिल्हा पातळीवर सर्व ५६८ एसटी स्थानकात साजरा केला जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष्य दिवाकर रावते यांनी दिली.

राज्यातील कोट्यवधी प्रवाशाची जीवनवाहिनी ठरलेल्या एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही स्वीकारले आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने सामान्यांसाठी नेहमी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, गरीब आणि वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात सवलती दिल्या आहेत. लाल परीपासून सुरु केलेला एसटीचा प्रवास आता हिरकणी, शिवनेरी, आणि विठाई अशा सुखद टप्प्यावर आला आहे.

Pages