आ.तानाजी सावंत - कॅबिनेट मंत्रीपद मिळताच शिवसेना महिला आघाडी तर्फे शैला गोडसे यांनी केला सत्कार..
पंढरपूर / मदार सय्यद
----------------------------
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन, रस्ते, शिक्षण,उधोग,वीज, आदी योजना राजकीय इच्छाशक्ती व निधी अभावी अपूर्ण आहेत. मला मिळालेल्या या कॅबिनेट मंत्री पदाचा या सर्व योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकरी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी प्रसंगी मंत्रिपद पणाला लावू मात्र विकासाचा अनुशेष भरून काढला जाईल आसे आश्वासन कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी दिले.
राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी नव्याने विस्तार करण्यात आला. यामध्ये सोलापूर चे संपर्क प्रमुख आ तानाजी सावंत यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा यासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी शपथविधी ला उपस्थिती राहून शपथविधी नंतर राजभवन परिसरात तानाजी सावंत यांची भेट घेऊन सत्कार केला. व उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी आधीवेषनात पंढरपूर-मंगळवेढा मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा उपसासिंचन योजना, म्हैसाळ योजना , अपूर्ण कालव्याची कामे, रस्ते, वीज, उधोग, शिक्षण, आरोग्य, या शिवाय पंढरपूर मध्ये उपजिल्हा रुग्णालय, रस्त्याची अपूर्ण कामे, भीमा नदीवर बॉरेजस बांधणे, पंढरपूर तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे, उपनगरातील विविध प्रश्न आदी योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. यावर कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी सर्व योजनांसाठी मंत्रिमंडळ स्तरावर पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील आसे आश्वासन दिले.
येवेळी शिवसेनेचे जिल्हा सन्वयक प्रा.शिवाजी सावंत सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोगे पाटील जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,जिल्हाप्रमुख गणेश वानकर, विधानसभा संपर्कप्रमुख संतोष माने उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख जयवंत माने तालुकाप्रमुख महावीर देशमुख तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे शहर प्रमुख रवींद्र मुळे विधानसभा समन्वयक समन्वयक संजय घोडके ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख महेश कदम प्रताप देशमुख, पंढरपूर तालुका महिला आघाडी प्रमुख आरती बसवंती उपशहर प्रमुख विनायक वनारे सचिन बंद पट्टे , , नितीन शेळके, विनोद कदम, , गणेश जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"आ.तानाजी सावंत यांची कॅबिनेट मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. ही सोलापूर जिल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा ते पंढरपूर-मगळवेढा मोहोळ सह जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणणे, व अपूर्ण विकास योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील असा आपल्याला विश्वास आहे. जिल्ह्यात शिवसेनेला त्यांना मिळालेल्या मंत्री पदामुळे नव्याने बळ मिळाले आहे.
शैला गोडसे.
सोलापूर जिल्हाप्रमुख शिवसेना महिला आघाडी.