आज रमजान ईद दिनी पंढरपूर व मंगळवेढा भागातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा - आमदार भारत भालके - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, June 4, 2019

आज रमजान ईद दिनी पंढरपूर व मंगळवेढा भागातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा - आमदार भारत भालकेमंगळवेढा / मदार सय्यद

---------------------------------

       

            पंढरपूर व मंगळवेढा शहरतील विद्युत महावितरण कंपनीकडून दर बुधवारी सकाळी 10 पासून ते सायं.5 पर्यंत लोडशेडिंग करून विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. परंतु बुधवार दि.05.06.2019 रोजी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा अत्यंत पवित्र व मोठा सण असल्याने सदर दिवशी विद्युत पुरवठा (लोडशेडिंग) खंडीत करण्यात येऊ नये. लोडशेडिंगमुळे रमजान ईद या सणानिमित्त मुस्लिम बांधवांना नाहक त्रास होऊन या सणाच्या आनंदी उत्साहात व्यत्यय येऊ नये म्हणून बुधवार दि.05.06.2019 रोजी कोणत्याही प्रकारचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये याची संबंधित अधिकार्‍यांनी गांभीर्याने दक्षता घेऊन योग्य ती कार्यवाही करणेबाबत, तसेच  सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेतकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी, सिंचनासाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोय व्हावी म्हणून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा पुर्ववत ठेवण्याबाबत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार  भारत भालके यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या असल्यामुळे सदर भागातील नागरिकांना ईदच्या सणादिनी तसेच शेतकर्‍यांना याचा फायदा होणार असल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

Pages