इव्हीएम विरोधात 'वंचित' करणार घंटानाद : १७ जूनला राज्यव्यापी आंदोलनाची पडळकरांची घोषणा - Pantnagari Times

Breaking News

Saturday, June 15, 2019

इव्हीएम विरोधात 'वंचित' करणार घंटानाद : १७ जूनला राज्यव्यापी आंदोलनाची पडळकरांची घोषणा १७ जूनला राज्यव्यापी आंदोलनाची पडळकरांची घोषणा


 पंढरपूर / मदार सय्यद

-----------------------------


वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपिचंद पडळकर यांची पंढरपूर मध्ये पत्रकार परिषद

      'इव्हीएम हटाव ,देश बचाव चा नारा'

राज्यातील ४८लोकसभा मतदारसंघात  प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीतील आकडेवारीत तफावत असल्याचा गोपीचंद पडळकर यांचा आरोप

 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांमध्ये एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी यांमध्ये तफावत आढळून येते. या बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा देत भारिप बहुजन आघाडीने दिला आहे. यास पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीही या आंदोलनात सहभागी होणार असून ईव्हीएम च्या वापरा विरोधात राज्यभर घंटानाद आंदोलन केले जाईल असा इशारा आघाडीचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

येत्या १७ जून रोजी राज्यभरातील जिल्हा आणि तालुका तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे (बॅलेट पेपर) मतदान व्हावे, अशी मागणी यावेळी गोपीचंद पडळकर यांनी केली. भारत निवडणूक आयोगाने ईव्हीएम वापराचा अट्टहास करून पारदर्शक निवडणूक घेतल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांच्या मौलिक अधिकारांचे उल्लंघन करणे हा अपराध असून हे काम निवडणूक आयोगाने केल्याचा आरोप करीत देशभरात ईव्हीएम विरोधात असंतोष वाढत असून या लोकसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामुळे जनताही आशचर्यचकित झाली असलयाचे पडळकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस माऊली हळणवर ,अंकुश शेंबडे आदीसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pages