जत अंजुमन उर्दू हायस्कूल चा निकाल ८१.८१ टक्के. कु.जावेरीया नदाफ हिने शाळेत प्रथम क्रमांक मिळवला - Pantnagari Times

Breaking News

Monday, June 17, 2019

जत अंजुमन उर्दू हायस्कूल चा निकाल ८१.८१ टक्के. कु.जावेरीया नदाफ हिने शाळेत प्रथम क्रमांक मिळवला     जत / मदार सय्यद

    ------------------------


              जत येथील मुस्लिम समज प्रबोधन संस्था संचालित   अंजुमन उर्दु हायस्कुल चा  निकाल ८१.८१ % इतका  लागला  आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्ववच  विद्यार्थ्यांमध्ये प्रथम,द्वितीय  व तृतीय अशा तीन ही क्रमवारीत मुलींनीच बाजी मारल्याने  शालेय विद्यार्थिनींमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले असून पालक वर्गातून ही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  कु.जवेरिया अलिऐशर नदाफ (जत) ८o टक्के इतके  गुण संपादन करून शाळेत सर्वप्रथम  येण्याचं मान मिळवलं आहे.

 कु. फिजा हाजीमलंग कोरबो  (धावडवाडी) हिने  ७९.२o टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवले आहे व तसेच  कु. अल्फीया अब्दुल रझाक मसरगुप्पी (जत) विद्यार्थीनी ने ७७.२०% टक्के गुण घेऊन दैदिप्यमान यश मिळऊन शाळेचे नाव उज्वल केले आहे. यास बरोबर￰  कु.सबिहा हबीब नागरबावडी (जत) ७६.४०टक्के,

 कु. बशीरा साहेबलाल शेख   (धावडवाडी)७६.२० टक्के इतके मार्क्स  मिळऊन गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदवले.  संस्थे चे अध्यक्ष डॉ.अजीम चट्टरकी,सचिव इब्राहीम अमीन मुल्ला व  शाळेचे मुख्याध्यापक  राईसअहंमद खान यांनी  सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.याच शाळेने गेल्या आठ वर्षे दहावीचा निकाल हमखास सलग १०० टक्के इतका  लावून शिक्षण क्षेत्रात  नावलौकिक प्राप्त केले आहे. शाळेची  गुणवत्ता आणि  उच्च शैक्षणीक दर्जा यामुळे  शेजारच्या सोलापूर जिल्ह्ल्यातील सांगोला,जवळा,घेरडी व मंगळवेढा येथील मुले ही यशाळेत शिक्षण घेत आहेत.विद्यार्थ्यांना सहशिक्षक तौसिफ़ इमरोज, अल्लारखा मुजावर, कलीम बागवान,शिरीन बागवान मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तालुका पातळी वरून सर्वच यशश्वी विद्यर्थ्यंवर अभिनंदनाचे  वर्षाव होत  आहे .

Pages