मंगळवेढा / मदार सय्यद
-------------------------------
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी व बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यासाठी तसेच इतर मागण्यासाठी नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांसोबत गेल्या चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी भीमा कालवा मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता ज्योतिर्लिंग पाटकर, उजनी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता नारायण जोशी व उपकार्यकारी अभियंता मनोज कुमार पंडित यांनी शैला गोडसे गोडसे व आंदोलकांशी चर्चा करून मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याचा अहवाल एक महिन्यात शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल व दोन महिन्यापर्यंत या अहवालास मंजुरी घेण्यात येईल असे भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता यांचे लेखी पत्र व कृष्णा खोरे महामंडळाचे मुख्य अभियंता विलास राजपूत यांनी ठोस आश्वासन शैला गोडसे व आंदोलनकर्त्यांना दिले. यावर शैला गोडसे यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांसोबत चर्चा करून सर्वानुमते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंदोलकांना दिलेल्या पत्रानुसार मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाची राज्य तांत्रिक सल्लागार समिती पुणे यांनी काढलेल्या त्रुटींची पूर्तता दहा दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून छाननी अहवालास मंजुरी घेऊन महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल शासनास एक महिन्यात मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. त्यानंतर एक महिन्यापर्यंत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन मुंबई व शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालास मंजुरी देण्यात येईल. सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालास शासनाची प्रशासकीय मंजुरी मिळताच सात दिवसात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
यावेळी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, पंचायत समिती माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, दामाजीचे संचालक राजेंद्र पाटील, दामाजी संचालक भुजगराव आसबे विनोद कदम तालुका प्रमुख तुकाराम कुदळे रासपचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे,जनसेवा संघटना तालुकाध्यक्ष पाडूरंग जावळे. शिवसेना तालुका उपप्रमुख संभाजी खापे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाध्यक्ष दत्ता कळकुंबे, कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे,अंबादास शिंदे, हणमंत शिंदे, वसंत गरंडे, वसंत बंडगर, महादेव करे दादा पाटील , महिला आघाडी तालुकाप्रमुख आरती बसवंती, माजी तालुकाप्रमुख सुशीला सलगर, शहर प्रमुख शारदा जावळे,उमेश क्षीरसागर सुग्रीव पाटील गणेश घाडगे विशाल जाधव माऊली आमले हे उपस्थित होते.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला दोन महिन्याच्या आत मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य शासनाकडून घेण्यात येईल आणि त्यानंतर बजेट उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल याची खात्री कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता विलास राजपूत यांनी दिल्यानंतरच तसेच त्यांचे प्रतिनिधी कार्यकारी अभियंता नारायण जोशी यानी आंदोलनस्थळी समक्ष उपस्थित राहून लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्यानंतरच आमचे ठिय्या आंदोलन स्थगित केले आहे दुष्काळी भागातील ही योजना होण्यासाठी आ. डॉ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून यापुढेही शासनाच्या स्तरावर आमचा पाठपुरावा सुरूच राहील
शैला गोडसे
जि. प. सदस्या