करमाळा / मदार सय्यद
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात फिल्डमन पासून नोकरीला सुरुवात केलेले धनंजय डोंगरे हे आदिनाथचे अध्यक्ष करण्याची किमया बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल केली आहे. एका कामगाराला अध्यक्षपद मिळण्याची ही पहिली वेळ आहे.
फिल्डमन ते आदिनाथचे अध्यक्ष असा धनंजय डोंगरे याचा प्रवास राहिलेला आहे. 1993 ते 1998 ते कारखान्यात शेती विभागात फिल्डमन म्हणून कामगार होते. नंतर ते राजकारणात आले. ते पहिल्यांदा 2000 ते 2005 या कालावधीत कुगांवचे सरपंच झाले. त्यानंतर 2010 ते 2015 दुसऱ्यांदा ते सरपंच झाले. त्यांनी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात ते दुसऱ्यांदा संचालक म्हणून निवडुन आले आहेत. मध्यंतरी बाजार समीतीच्या सभापती निवडीच्या वेळी प्रा. शिवाजी बंडगर यांना बागल गटात आणुन सभापती करण्यात ही त्यांची महत्वाची भुमीका होती.
---------------
स्व. दिंगबराव बागल यांचा विश्वासु कार्यकर्ते म्हणुन मी काम केले आहे. आजही आमच्या नेत्या रश्मी बागल, मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या विश्वास पात्र ठरून मला अध्यक्षपदाची संधी दिली. एका कारखान्याच्या कामगारांला त्याच कारखान्याचे अध्यक्ष करण्याचे धाडस फक्त बागल गटच करू शकतो.
- धनंजय डोंगरे, नुतन अध्यक्ष