मंगळवेढा उपसा सिंचन योजना ठिय्या आंदोलनासाठी नंदेश्वर मध्ये महिला एकवटल्या.. - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, June 4, 2019

मंगळवेढा उपसा सिंचन योजना ठिय्या आंदोलनासाठी नंदेश्वर मध्ये महिला एकवटल्या..मंगळवेढा उपसा सिंचन योजना ठिय्या आंदोलनासाठी महिला एकवटल्या..

उपअधीक्षक अभियंत्यांची आंदोलकांशी चर्चा - योजनेतून वगाळलेल्या गावातील शेतकरी, शिवसैनिक आक्रमक.


मंगळवेढा मदार सय्यद

--------------------------------

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी दोन दिवसांपासून नंदेश्वर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात या योजनेतून वगळलेल्या गावातील शेतकऱ्यांनी आक्रमक धोरण स्विकारत आंदोलनात महिलांसह सक्रियता दाखवली आहे. दुसऱ्या दिवशी उपधीक्षक अभियंता जे. जे. पाटकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकाशी चर्चा केली मात्र ठोस आश्वासना शिवाय माघार घेणार नसल्याचा पवित्रा महिला आंदोलकांनी घेतल्याने प्रशासना समोर पेच निर्माण झाला आहे.

मंगळवेढा उपसासिंचन योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळी गावांतील शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत. वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनकडून ठोस उपाययोजना राबविण्यात येत नाहीत. म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे या सोमवार पासून लाभार्थी गावातील शेतकरी, शिवसैनिक यांच्यासह बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत.

उपसासिंचन योजनेचे कमी झालेले एक टीएमसी पाणी वाढवून मिळावे. योजनेला आचार संहिता लागण्यापूर्वी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी. येणाऱ्या अर्थ संकल्पत आवश्यक निधी उपलब्ध करून योजनेच्या कामाच्या तात्काळ निविदा काढाव्यात. व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. आदी विविध मागण्यांसाठी आंदोलक ठिय्या मारून बसले आहेत. दुसऱ्या दिवशीही या आंदोलनाला लाभार्थी गावांतील शेतकऱ्यांनी भर उन्हात उपस्थित राहून आक्रमक धोरण अवलंबिले आहे. 

उपजिल्हा प्रमुख तुकाराम भोजने, विधानसभा समन्वयक बंडु कलुबर्मे, उपतालुकाप्रमुख संभाजी खापे, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता कळकुंबे, , अंबादास शिंदे, विजय सलगर, उमेश क्षीरसागर, महिला आघाडी तालुकाप्रमुख आरती बसवंती, महिला आघाडी शहर प्रमुख शारदा जावळे, महिला आघाडी तालुका समन्वयक सुशीला सलगर, अर्चना भालेराव यांचेसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

वगळलल्या गावातील शेतकरी आक्रमक..

सन 2014 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर घाई गडबडी मध्ये या योजनेला प्रशासकीय मान्यता देताना प्रशासनावरील दबावापोटी अनेक चुका झाल्या होत्या त्यामुळे नव्या आराखड्यांनुसार निम्म्याहून जास्त गावे योजनेतून वगळली जाणार आहेत. त्यामुळे या गावातील शेतकरी अधिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनात सक्रिय उपस्थितीती दाखवत आक्रमक धोरण स्वीकारले आहे.

Pages