मंगळवेढा / मदार सय्यद
----------------------------------
मंगळवेढा तालुका भारतीय बहुजन महासंघ व बहुजन वंचित आघाडी एम आय एम या पक्षाच्या वतीने आज सोमवार दिनांक 17 6 2019 रोजी प्रांत कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन व घंटानाद आंदोलन करण्यात आले हे आंदोलन बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष महादेव ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोक माने ,
शहराध्यक्ष सोमनाथ ढावरे, तानाजी चौगुले, विनायक सोनवले बिरा वाघमोडे, विश्वास सरवदे, युवक नेते संतोष माने, तेजस्विनी सरवदे ,बाबा वाघमारे, सोपान गायकवाड, यांच्या तब्बल 100 च्या आसपास कार्यकर्ते या उपोषणासाठी प्रांत कार्यालयासमोर बसले होते मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी यांना यावेळी निवेदन देऊन आपल्या घंटानाद आंदोलनाचा सर्व कार्यकर्त्यांनी समारोप केला यावेळी बोलताना बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष महादेव ढोणे म्हणन नुकत्याच देशांमध्ये झालेल्या लोकसभेच्या या व्यवस्थित रित्या झाल्या नसून मतदानाबाबत वारंवार शंका निर्माण होत असल्याने येणाऱ्या निवडणुका ह्या मत पत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत भारिपचे अध्यक्ष अशोक माने यांनी केले यापुढील काळामध्ये ही हे आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यां सोबत दिला सदरचे घंटानाद आंदोलन शांततेच्या मार्गाने केले गेले