मंगळवेढा / मदार सय्यद
------------------------------------
सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी आज विधीमंडळात पंढरपूर व मंगळवेढा येथील तरूणांना आम्लीपदार्थापासून दूर ठेऊन, नशामुक्त जीवन जगण्यासाठी शासनाने तातडीने बेकायदा गुटखा व इतर आम्लीपदार्थ विकणार्या व्यक्तींवर व दोषी पोलीस प्रशासनांवर कठोर कारवाई करून भावी तरूण पिढीला नशामुक्त जीवन जगण्यासाठी परावृत्त करावे, अशी लक्षवेधी केली. आमदार श्री भालके यांनी या विषयासंदर्भात यापूर्वीही सभागृहात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर कारवाई करतांना शासनाने त्या अवैधरित्या गुटखा प्रकरणी संबंधीत पोलीस खात्यातील कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई केली होती, परंतु संबंधित कारवाई केलेले पोलीस आता पुन्हा कामावर आले असून त्यांनी पुन्हा पूर्वीचेच पाढे वाचण्याचे प्रकार सुरू केले आहेत. या अवैध गुटखा विकणार्या व तयार करणार्या सोबत संगनमत करून या अवैध व्यवसायास चालना देण्याचे काम पोलीस कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत असल्यामुळे अशा बेजबाबदार पोलीसांना कायद्याचा कोणताही धाक राहिला नसल्याचे दिसून येते.
या लक्षवेधीवर उत्तर देतांना राज्याचे गृहराज्य मंत्री मा.ना.श्री रणजित पाटील हे आपला देश जगात महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत असतील आणि जर तरूण पिढी अशा व्यसनांच्या आहारी जात असेल आणि शासन त्यावर कोणत्याही उपाय योजना न करीत नसेल तर असले अवैध गुटखा दारू वगैरे आदी धंदे जोमात चालत राहतील मग भारत देश महासत्ता कसा बनेल? असा सवाल आमदार श्री भालके यांनी केला. तसेच शासनाने या गंभीर विषयाकडे व भारतातील तरूण पिढीच्या आरोग्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने अशा अवैधरित्या नशील्या पदार्थांची विक्री करणारे व त्यांची उत्पादने करणार्या व्यापारी व त्यास मदत करणारे शासनाचे दोषी कर्मचारी यांचेवर शासन कोणती कडक कारवाई करणार? असा प्रश्न आमदार श्री भारत भालके यांनी विचारला.
त्यावर उत्तर देतांना राज्याचे गृह राज्यमंत्री यांनी सांगितले की, या अशा अवैधरित्या नशील्या पदार्थांची विक्री करणारे व त्यांचे उत्पादक यांना मदत करणारे शासनाचे दोषी कर्मचारी यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच आम्ली पदार्थांची विक्री व उत्पादने यास प्रतिबंध घालण्याबाबतच्या सूचना संबंधितांना आज आता ताबडतोब देण्यात येतील. तसेच सीमावर्ती भागामध्ये ठिक-ठिकाणी होत असलेली गुटख्याची अवैध वाहतुकीस प्रतिबंध घालावा म्हणून सर्व संबंधीत ठिकाणी चेकपोस्ट किंवा पथनाके कार्यान्वीत करून सदर ठिकाणी पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती तातडीने करण्याचे आदेशही देण्यात येतील असेही आमदार श्री भारत भालके यांच्या लक्षवेधीवर बोलत असतांना विधिमंडळाच्या सभागृहात सांगण्यात आले