आमदार भारत भालके यांची महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड. - Pantnagari Times

Breaking News

Monday, June 17, 2019

आमदार भारत भालके यांची महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड. मंगळवेढा / मदार सय्यद

--------------------------------


 महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाच्या विधानसभेच्या तालिका अध्यक्ष म्हणून आमदार  भारत नाना भालके यांची निवड करण्यात आली असून सर्वानुमते निवड झाल्याचे पत्र माननीय अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले असून या निवडीबाबत घोषणा माननीय अध्यक्ष यांनी आज दिनांक 17 -6- 2019 रोजी विधानसभा सभागृहात केली असून आमदार भारत नाना भालके यांच्या आजवरच्या विधिमंडळाच्या कामकाजाचा दहा वर्षाच्या  अनुभव लक्षात घेता त्यांची निवड करण्यात आल्याचे समजते आमदार भारत नाना भालके यांचे वकृत्व पाहता व त्यांचे मुद्देसूद अभ्यासपूर्ण बोलण्याची शैली , पहाडी आवाज,  यांचा प्रत्यय  अणेकदा सभग्रहाने अनुभवला आमदार भारत नाना भालके यांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बोलत असतांना सभागृहांमध्ये भूमिका मांडतांना यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, विद्यार्थी , सामान्य नागरिक, यांच्यासह विविध जाती धर्मातील प्रलबीत विषयाबाबत  पोटतिडीकेने विधानसभेमध्ये न्याय मागण्याची भूमिका आमदार भारत नाना भालके यांनी मांडल्याचे दिसून येत आहे तसेच सर्व जातीधर्मातील जनतेसाठी व कामगार वर्ग कष्ट करी वर्ग यांच्यासाठी अनेकदा भारताना भालके आणि विधानसभांमध्ये अनेकदा प्रश्न उपस्थित करून न्याय मागण्याची भूमिका शासनाकडे केल्या दिसते तसेच मतदारसंघातील पाणीटंचाई भीषण दुष्काळी या सह मंगळवेढ्यातील कायम दुष्काळी 35 गावांसाठी असणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना अशी की 45 गावांसाठी कोरडवाहु योजना लागू करण्या साठी चा विषय असो  आदी विषयांसह ,दुष्काळी परिस्थिती पंढरपूर मंगळवेढा शहराचा विकास अशा अनेक  अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयावर बोलत असताना संपूर्ण सभागृहात,सर्व सदस्य शांतपणे त्यांचे भाषण ऐकत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येत असते, त्यामुळे आमदार भारत नाना भालके यांच्या या शिस्तप्रिय स्वभावाने त्यांनी अनेकदा सर्व सभागृहातील सदस्यांच्या मने जिंकली व शासनाला न्याय देण्याची भूमिका बजावावी लागली,

त्यांनी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध योजना राबविण्यात शासनाला भाग पाडले,

त्यामुळे त्यांच्या विधिमंडळाच्या 10 वर्षाची प्राधिर्ग कारकीर्द पाहता व त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून केल्याचे समजते,त्यामुळे आमदार भारत नाना भालके यांची या पदावर नियुक्ती झाल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघा सह संपूर्ण महाराष्ट्र राज्याला न्याय देण्याचे भूमीला ऊत्तम पणे पार पाडतील कारण भारत नाना भालके यांची शिष्तप्रिय वागणूक असल्याने ते सर्वोच्च सभागृहात सदस्यांना शिस्त लावण्याचे काम निश्चितच करतील अशी खात्री सर्वांनाच असावी त्यामुळे त्यांची निवड केल्याचे सांगितले

तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रथमच विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाचा विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड होण्याचं मान पहिल्यांदा आमदार भारत नानांच्या रूपानेपंढरपूर-मंगळवेढा तालुक्यास मिळाल्याने संपूर्ण जनतेची मान गौरवाने उंच झाल्याने, आमदार भारत भालके यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Pages