पी एम किसान योजना तळागाळापर्यंत राबविण्यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे सरसावले - Pantnagari Times

Breaking News

Sunday, June 16, 2019

पी एम किसान योजना तळागाळापर्यंत राबविण्यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे सरसावलेमंगळवेढा / मदार सय्यद


 तहसीलदार स्वप्निल रावडे यांचे शेतकरी वर्गातुन कौतुक: मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना मिळणार लाभ

पी एम किसान योजनेचा लाभ मिळावा यासाठी मंगळवेढ्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती टाकून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन केल्याने शेतकरी वर्गातून तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या यांचे कौतुक होत आहे.

मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रानडे यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली पी एम किसान योजना याबाबत एक सक्षम मोहीम राबविली असून शेतकऱ्यांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी स्वतः व्हाट्सअप फेसबुक व न्युज पेपर च्या माध्यमातून चांगली पब्लिसिटी करून पी एम किसान योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले असल्याने तहसीलदार स्वप्निल रावडे यांचे शेतकरी वर्गातुन कौतुक केले जात आहे.

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी गावातील शेतकऱ्यांंना पी एम किसान योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामसेवक मारुती जुंदळे व ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचाऱ्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांकडून फॉर्म घेऊन ते फॉर्म काॅम्प्युुुुटर मध्ये एक्सल मध्ये संपुर्ण माहिती अपडेट केली असून तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी गाव सध्या पी एम किसान योजना सर्वाधिक पुढे असणार आहे. याबाबत महसूल विभागाचेे पोलके यांनी ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे

अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शनिवारी सायंकाळी या योजनेची माहिती ग्रामसेवक व तलाठी यांच्या मार्फत देण्यात आली होती रविवार हा सुट्टीचा दिवस असून सुद्धा तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांचेकडे तालुक्यातील ८१ गावे विभागून दिलेली आहेत. आज उद्या सर्व जण गावात जाऊन पात्र कुटुंबाकडून अर्ज भरून घेतील. त्याबरोबर आधार कार्ड आणि बँक पास बुक ची झेरॉक्स घेण्याच्या सूचना तहसीलदार रानडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत

ही योजना नव्याने सर्व शेतकऱ्यांना (कोणत्याही क्षेत्राच्या अटी शिवाय) लागू करण्यात आलेली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावी जेणेकरून या योजनेचा लाभ सर्वांना त्वरित देण्यासाठी फायदा होईल असे आवाहन त्यांनी केले आहे विशेष म्हणजे या योजनेत कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि १८ वर्ष वय खालील मुले १८ वर्ष वयाचे वरील मुले असतील तर त्यांचे नावे जमीन असल्यास त्यांना वेगळे शेतकरी कुटुंब समजले जाईल आणि त्यांनी वेगळा अर्ज अधिकाऱ्यांकडे जमा करावा असे आवाहन तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.

Pages