दक्षिण भागाच्या पाणीप्रश्नासाठी शैला गोडसे यांचा आजपासून नंदेश्वर येथे एल्गार - Pantnagari Times

Breaking News

Sunday, June 2, 2019

दक्षिण भागाच्या पाणीप्रश्नासाठी शैला गोडसे यांचा आजपासून नंदेश्वर येथे एल्गार
मंगळवेढा / मदार सय्यद

------------------------------


                  शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी व निधी मिळून या योजनेचे काम त्वरित सुरू करावे यासाठी अधिक्षक अभियंता भिमा कालवा  मंडळ सोलापूर याना निवेदन दिले होते. 31 मे पर्यंत जर प्रशासनाने याबत काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आजपासून नंदेश्वर येथे ठिय्या आंदोलन होणार आहे.

मंगळवेढा उपसा सिंचन योजना 2014 साली मंजूर झाली. 2014 पासून आजपर्यंत ही योजना कार्यान्वित झाली नाही. एखादी योजना मंजूर झाल्यापासून पाच वर्षात सदर योजनेस निधी अथवा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही तर ती योजना रद्द होते. 

राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना  शिवसेना उपनेते आ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत यापूर्वीही 2018 मध्ये निवेदन दिले. तसेच कृष्णा खोरे महामंडळाचे प्रमुख अभियंता अन्सारी यांच्याकडे आपल्या उपस्थितीत बैठक झाली होती .प्रशासकीय पातळीवर   प्रत्यक्ष भेटूनही तीन ते चार वेळा पाठपुरावा केला होता. प्रशासन  कडून कसलीही कार्यवाही होताना दिसत नाही.त्यामुळे सदर योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन व या योजनेचे पाणी कमी न करता टेडर काढून  प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी  आंदोलनाचा  इशारा शैला गोडसे यांनी दिला होता.

Pages