टेंभुर्णी / मदार सय्यद
---------------------------
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात मिरज येथील भाजपचे आमदार डॉ.सुरेश खाडे यांची समाज कल्याणमंत्री म्हणून वर्णी लागल्याने टेंभुर्णीत त्यांच्या निवडीचा जल्लोष करण्यात आला असून फटाके वाजवून पेढा भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सातपुते,शुभम सातपुते,संजय खरात,सतिस शिंदे,मनोज राठोड,सागर खरात,किसन शिंदे,गणेश खरात,शरद पवार,अमर पवार,सुमित खरात,रामा काळे हे उपस्थित होते.