मंगळवेढा तालुक्यातील 7 रस्त्यांच्या कामासाठी 14 कोटी 64 लाखाचा निधी -आ. भारत भालके - Pantnagari Times

Breaking News

Friday, June 14, 2019

मंगळवेढा तालुक्यातील 7 रस्त्यांच्या कामासाठी 14 कोटी 64 लाखाचा निधी -आ. भारत भालके मंगळवेढा / मदार सय्यद 

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन 2019-20 या वित्तीय वर्षात बॅच-1 व बॅच-2 अंतर्गत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सात रस्त्यांच्या कामांसाठी 14 कोटी 64 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आ भारत भालके यांनी दिली

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी हा निधी मिळाला आहे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ते कचकल वस्ती गूळ फॅक्टरी – 4कि. मी. – 266.86 लाख

लाख रुपये मंजूर झाले आहेत

मंगळवेढा तालुक्यातील 1)मारोळी ते जाडर बोबलाद 2कि. मी. – 171.38 लाख 2)शिरसी ते पाटील,खटकाळे, बोरकर वस्ती 2 कि. मी. – 174.50 लाख 3)अरळी ते चव्हाण वस्ती3.75 कि.मी- 291.79 लाख

4) खोमनाळ ते हिवरगाव2 कि.मी. – 159.87 लाख

5) उचेठाण ते जगताप वस्ती रस्ता 2 कि.मी. – 159.29 लाख

6)हुन्नूर ते सुर्यवंशी वस्ती रस्ता 2.60.कि.मी. – 240.81 लाख

यामधील बॅच-1 मधील रस्त्यांच्या कामाच्या टेंन्डर प्रक्रिया सुरू आहे व बॅच-2 मधील रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाले असून या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी व दोन एकमेकांना जोडली जावी यासाठी आ भालके यांनी ऑगस्ट 2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील ,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळे या भागातील 7 रस्त्यांच्या कामासाठी 14 कोटी 64 लाखाचा निधी मिळाला असून यातील काही कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे तर काही कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ही रस्त्याची कामे सुरू होणार आहेत या रस्त्याच्या कामांना निधी मिळाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे ही कामे ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त राहून ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सडक योजनेच्या धर्तीवर ही कामे केली जाणार आहेत.

Pages